जाहिरात
Story ProgressBack

नवविवाहितेचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांना कोंडून घर पेटवले, सासू सासऱ्यांचा मृत्यू

मूळची धूमनगंजची रहिवासी असलेल्या अंशिकाचं लग्न मुठ्ठीगंज येथील व्यापारी अंशू याच्यासोबत झाला होता.

Read Time: 2 min
नवविवाहितेचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांना कोंडून घर पेटवले, सासू सासऱ्यांचा मृत्यू
प्रयागराज:

नवविवाहितेचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याने तिच्या सासरच्या घराला आग लावून दिली. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये घडलेल्या या घटनेनंतर करण्यात आलेल्या जाळपोळीत नवविवाहितेच्या सासू सासऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अंशिका असं नवविवाहितेचे नाव असून तिच्या मृत्यूनंतर तिच्या घरचे जबरदस्त संतापले होते. त्यांनी अंशिकाचे सासर गाठत तिच्या सासरच्या मंडळींना मारहाण केली होती. अंशिकाचा मृत्यू आणि त्यानंतर घडलेली ही मारहाणीची घटना यामुळे प्रयागराजमध्ये तणावाचे वातावरण होते. यामुळे इथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

18 मार्चच्या रात्री नुकत्याच लग्न झालेल्या अंशिका केसरवानीचा मृतदेह तिच्या सासरी लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. मूळची धूमनगंजची रहिवासी असलेल्या अंशिकाचं लग्न मुठ्ठीगंज येथील व्यापारी अंशू याच्यासोबत झाला होता. अंशिकाच्या निधनाबद्दल समजताच तिच्या घरच्यांना जबरदस्त धक्का बसला होता. अंशिकाच्या निधनाचे वृत्त कळाल्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने तिचे सासर गाठले होते. अंशिकाचा मृत्यू संशयास्पदरित्या झाल्याचा संशय असल्याने तिच्या घरच्यांनी अंशिकाच्या सासरच्या मडळींसोबत वाद घातला होता. वादाचा पर्यावसन हाणामारीत झालं. 

अंशिकाच्या घरच्यांनी आरोप केला आहे की तिचा  हुंड्यासाठी छळ करण्यात आला होता. हुंड्यासाठी तिच्या सासरच्या मंडळींनी अंशिकाची हत्या केल्याचाही आरोप तिच्या घरच्यांनी केला.  अंशिकाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी काहींनी अंशिकाच्या सासरच्या मंडळींना घरात कोंडलं आणि घर पेटवून दिलं. या दुर्घटनेत अंशिकाच्या सासू सासऱ्यांचाही मृत्यू झाला. प्रयागराजचे पोलीस उपायुक्त दीपक भूकर यांनी सदर घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, 18 मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास एक फोन आला होता,  अंशिका केसरवानी नावाच्या तरुणीनं आत्महत्या केल्याची माहिती आम्हाला फोन करणाऱ्याने दिली होती. घटनास्थळी अंशिकाच्या सासरच्या आणि माहेरच्या मंडळींमध्ये वाद सुरू होता. पोलीस घटनास्थळी पोहोचले  तेव्हा दोन्ही बाजूंमध्ये कडाक्याचं भांडण सुरू होतं.

पोलिसांनी पुढे सांगितले की, वाद सुरू असतानाच अंशिकाच्या माहेरच्या लोकांनी घर पेटवून दिलं. पोलिसांनी तातडीनं मदत करत 5 जणांना आगीतून वाचवलं. अग्निशमन दलाला आगीची सूचना देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या पथकानं घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणली, आग विझल्यानंतर मध्यरात्री तीनच्या सुमारास घराचा शोध घेण्यात आला. यावेळी अगिनशमन दलाला दोघांचे मृतदेह सापडले. यातील एक मृतदेह अंशिकाचे सासरे राजेंद्र केसरवानी यांचा होता, तर दुसरा मृतदेह अंशिकाची सासू शोभा देवी यांचा होता.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination