जाहिरात

Nylon Manja Crime : नायलॉन मांजा वापराल तर थेट आई-वडिलांवर कारवाई, आतापर्यंत 11 मुलांचे पालक अटकेत

विशेष म्हणजे या गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध झाल्यास तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

Nylon Manja Crime : नायलॉन मांजा वापराल तर थेट आई-वडिलांवर कारवाई, आतापर्यंत 11 मुलांचे पालक अटकेत

गेल्या आठवड्यात नायलॉज मांजामुळे महाराष्ट्रात घडलेल्या गंभीर घटनांमुळे पोलीस अलर्ट मोडवर आली आहे. राज्यभरात नायलॉन मांजामुळे कित्येत बाईकस्वार जबर जखमी झाले आहेत. वारंवार मांजाबाबत जनजागृती करूनदेखील मांजा वापर थांबला जात नसल्याने आता पोलिसांकडून अल्पवयीन मुलांच्या पालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

संक्रातीच्या आदल्या दिवशी नायलॉन मांजा वापरणाऱ्या 11 अल्पवयीन मुलांच्या पालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या कारवाईची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध झाल्यास तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. या गुन्ह्याअंतर्गत दहा वर्षांच्या कारवाईची शिक्षा केली जाऊ शकते. 

भंडाऱ्याच्या लाखनीत नायलॉन मांजामुळे 24 वर्षीय तरुणाचा अपघात, गळ्याला दहा टाके.....
मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणात पतंगबाजी केली जाते. मात्र हे करत असताना प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजाच्या वापर नागरिकांच्या जिवावर उठला आहे. अशीच एक घटना भंडाऱ्यातील लाखनी उडान पुलावर घडली. नागपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या शुभम चौधरी या 24 वर्षीय तरुणाचा नागपूरवरून आपल्या स्वगावी गोंदियातील हिरापूर येथे जात असताना भंडाऱ्याच्या लाखनीतील उड्डाण पुलावर गळ्यात चायना मांजा अडकून अपघात झाला. त्यात गळा कापला गेल्याने तो गंभीर जखमी झाला. दरम्यान काही नागरिकांनी धाव घेत. शुभमला लाखनी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करत पुढील उपचारासाठी भंडारा येथील खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. उपचारादरम्यान शुभमच्या गळ्याला दहा टाके लावण्यात आले आहेत. संक्रांतीच्या काळात मोठ्या प्रमाणात बंदी असलेल्या नायलॉन म्हणजे चा वापर होतो. आणि त्यामुळे दिवसेंदिवस अशा अपघातांना आमंत्रण मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने अशांना बंदी असलेल्या नायलॉन मांजाच्या विक्रीवर आडा बसवण्याची गरज आहे.

Tigers Death : दहा दिवसांत पाच वाघांचे मृत्यू तर दोन वाघ बेपत्ता, संशयास्पद मृत्यूमुळे वनविभाग अलर्टवर

5 वर्षांच्या मुलाचा कापला गळा...
नाशिकच्या येवल्यात  नायलॉन  मांजामुळे पतंगोत्सवाला  गालबोट लागत आहे. मकर संक्रातीच्या पूर्वसंध्येला  येवल्याच्या कोटमगावात  देवराज दीपक कोटमे या 5 वर्षांच्या चिमुकल्याचा नायलॉन मांज्यामुळे गळा कापला गेल्याने त्याला 14 टाके पडले. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. येवल्यात आतापर्यंत नायलॉन मांज्याने 10 जण गंभीर जखमी झाले आहे.

नायलॉन मांजा अडकलेली घुबड अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप सोडवली..
नाशिकच्या सातपूरमध्ये सियेट कंपनी बाहेर एक घुबड पक्षी नायलॉन मांजाने लटकलेला असताना नागरिकांनी या घटनेविषयी अग्निशमक दलाला माहिती दिली. सातपूरच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी या पक्षाला सुखरूप बाहेर काढून त्याची गुंडाळलेल्या मांज्यातून सुटका केली. शहरात मकरसंक्रांत जवळ आली असता मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा दिसून येत आहे.  पोलीस अनेक ठिकाणी छापेमारी करीत आहेत. मात्र शहरात सर्रासपणे नायलॉन मांजा विक्री होत आहे. याचा परिणाम पशुपक्ष्यांना देखील पडताना दिसून येतोय यामुळे नायलॉन मांजा विक्रीवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

Kerla Crime: 4 वर्षात 64 जणांकडून अत्याचार, 40 जणांची नावे कळाली; 6 जण अटकेत

नक्की वाचा - Kerla Crime: 4 वर्षात 64 जणांकडून अत्याचार, 40 जणांची नावे कळाली; 6 जण अटकेत

अकोल्यात चायना मांज्याने ऐका महिलेचा पाय कापल्याने पडले 45 टाके....!
अकोला शहरातल्या जुने शहर परिसरामधील गुरुदेव नगर येथील कलावती मराठे ही महिला चायना मांजा पायात अडकल्याने गंभीर जखमी झाली आहे. या महिलेचा पाय मांज्याने इतका चिरला गेला की 45 टाके पडले आहेत. बरोबर एलसीबी व पोलीस विभाग चायना मांज्यावर कारवाई करत असतांना सुद्धा सर्वत्र चायना मांज्या दिसून येत आहे.


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com