जाहिरात

Mumbai Bomb Blast : दाऊदचा उजवा हात टायगर मेमन पुन्हा चर्चेत का आला? 32 वर्षांनंतर टाडा कोर्टाचा नवा आदेश

छोट्या-मोठ्या उद्योगांतून कोट्यवधींची संपत्ती उभा करणारा मुंबईच्या गुन्हेगारी जगातील बादशहा टायगर मेमन पुन्हा एकदा चर्चेत आहे. 1993 मध्ये मुंबईतील बॉम्ब स्फोटाचा मास्टरमाइंडला पुन्हा एकदा कोर्टाने झटका दिला आहे. 

Mumbai Bomb Blast : दाऊदचा उजवा हात टायगर मेमन पुन्हा चर्चेत का आला? 32 वर्षांनंतर टाडा कोर्टाचा नवा आदेश
मुंबई:

Tiger Memon : छोट्या-मोठ्या उद्योगांतून कोट्यवधींची संपत्ती उभा करणारा मुंबईच्या गुन्हेगारी जगातील बादशहा टायगर मेमन पुन्हा एकदा चर्चेत आहे. 1993 मध्ये मुंबईतील बॉम्ब स्फोटाचे मास्टरमाइंडला पुन्हा एकदा कोर्टाने झटका दिला आहे. 

स्पेशल टाडा कोर्टाने या प्रकरणात मोठी निर्वाळा दिला आहे. कोर्टाने 1993 मध्ये मुंबई बॉम्ब स्फोटाचा मास्टरमाइंड टायगर मेमन, त्याचा भाऊ याकूब मेमन आणि मेमन कुटुंबाशी संबंधित 14 अचल संपत्ती केंद्र सरकारला सोपवण्याचे आदेश दिले आहेत. या संपत्तीमध्ये फ्लॅट, दुकानं, ऑफिस आणि रिकाम्या फ्लॅट्सचा समावेश आहे. हे फ्लॅट्स मुंबईतील वांद्रे पश्चिम अलमेडा, सांताक्रूझ, कुर्ला आणि माहीम भागात आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

1993 च्या बॉम्ब स्फोटाचा मास्टरमाइंड...
टायगर मेमनचं खरं नाव अब्दुल रजाक मेमन आहे. तो 1993 मधील मुंबई बॉम्ब स्फोटाचा मुख्य सूत्रधार होता. 12 मार्च 1993 ला मुंबईत झालेल्या स्फोटाने संपूर्ण देशाला हादरवलं होतं. मुंबईत झालेल्या या 12 बॉम्ब स्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला होता आणि 700 हून जास्त लोक जखमी झाले होते. हा हल्ला भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यापैकी एक मानला जातो. टायगर मेनन याने या हल्ल्याचा कट भाऊ याकूब मेमन आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिमसोबत मिळून आखला होता. तपासानुसार, हा हल्ला 1992 मधील बाबरी मशीद विध्वंसानंतर झालेल्या दंगलीचा सूड उगवण्यासाठी करण्यात आला होता. 

Latest and Breaking News on NDTV

टायगर मेमनने गुन्हेगारीचं साम्राज्य कसं केलं उभं? 
टायगर मेमनचा जन्म मुंबईत झाला होता. 1980 च्या दशकात त्याने लहान-मोठे उद्योग सुरू केले होते. मात्र लवकरच त्याने अंडरवर्ल्डच्या जगात पाऊल ठेवलं. टायगरने दाऊद इब्राहिमसोबत मिळून तस्करीचं मोठं नेटवर्क उभं केलं. त्याचा मुख्य व्यवसाय सोनं, चांदी आणि इलेक्ट्रॉनिक सामानांची तस्करी करण्याचा होता. त्याने या धंद्यातून अनेक कोट्यवधी रुपये कमावले. टायरगरने आपल्या कमाईची रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आणि मुंबईच्या उच्चभ्रू भागात अनेक ठिकाणी संपत्ती खरेदी केली. 

Sudhakar Pathare: तेलंगणात अपघाती निधन झालेले आयपीएस सुधाकर पठारे कोण?

नक्की वाचा - Sudhakar Pathare: तेलंगणात अपघाती निधन झालेले आयपीएस सुधाकर पठारे कोण?

टायगर मेमनने आपला भाऊ आणि नातेवाईकांना या व्यवसायात सामील करून घेतलं. त्याचा भाऊ याकूब मेमन सीए होता. टायगर मेमनचा व्यवसाय सांभाळण्यात याकूबची महत्त्वपूर्ण भूमिका होती. याकूबने टायगरचा काळा पैसा वैध दाखविण्यासाठी खोट्या कंपन्या तयार केल्या आणि यात पैशांची गुंतवणूक केली.  

Latest and Breaking News on NDTV

टाडा कोर्टाने संपत्ती ताब्यात घेण्याचा दिला आदेश...
विशेष टाडा कोर्टाचे न्यायमूर्ती वीडी केदार यांनी 26 मार्चला याबाबत निर्णय दिला होता. यानुसार, मेमन कुटुंबाच्या 14 संपत्ती केंद्र सरकारला सोपविण्यात येईल. ही संपत्ती 1994 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या रिसीवरने आपल्या ताब्यात घेतली होती. कोर्टाने सांगितलं की, ही संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया 1992 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या एका आदेशाच्या आधारावर सुरू करण्यात आली होती. 1993 मध्ये स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेटर अॅक्टअंतर्गत केंद्र सरकारने कोर्टात यासंदर्भात अपील केलं होतं. 

Latest and Breaking News on NDTV

मेमन कुटुंब गप्पत..
टाडा कोर्टाने मेमन कुटुंबाला नोटीस पाठवून उत्तर मागितलं होतं. मात्र टायगर मेमन आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कोणतंही उत्तर दिलेलं नाही. टायगर मेमन फरार आहे, तर त्याचा भाऊ याकूब मेमनला 2015 मध्ये फाशी देण्यात आली. कुटुंबातील अन्य सदस्य अब्दुल रजाक मेमन आणि हनिफा मेमन ही या प्रकरणात शांत आहेत. त्यामुळे कुटुंबाकडून काहीही उत्तर न आल्यानं ही संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतल्याचं कोर्टाने सांगितलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: