जाहिरात

किस्सा अंडरवर्ल्डचा , गँगस्टर ते शायर! दाऊदचा हस्तक रियाज सिद्दीकीची भन्नाट कहाणी

रियाजच्या या कविता मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील त्याच्या वकील फरहाना शाह यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.

किस्सा अंडरवर्ल्डचा , गँगस्टर ते शायर! दाऊदचा हस्तक रियाज सिद्दीकीची भन्नाट कहाणी
मुंबई:

जितेंद्र दीक्षित 
   
Mumbai Underworld: राजकारणी आपल्या भाषणात शेर-ओ-शायरीचा वापर करतात यात नवीन काही नाही. पण, गोळ्या आणि धमक्यांची भाषा बोलणारे मुंबई अंडरवर्ल्डचे गँगस्टरही मिर्झा गालिबच्या भाषेचा आधार घेतात. हे ऐकून आश्चर्य वाटेल. दाऊद इब्राहिम टोळीशी (Dawood Ibrahim Gang) संबंधित असलेल्या एका आरोपीने तुरुंगाच्या चार भिंतीआड कवितासंग्रह तयार केला आहे. तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. त्याच्या कविता ही त्याच्या प्रोफेशनला शोभणाऱ्याच होत्या. त्या कविता शायरी यावर आपण एक नजर टाकणार आहोत. 

गँगस्टर ते शायर प्रवास
हा व्यक्ती म्हणजे दाऊदचा कथित हस्तक रियाज सिद्दीकी आहे. त्याने आपल्या कवितांमधून नॅनो कारच्या लॉन्चिंगपासून (Nano Car Launch) ते तुरुंगातील जीवनापर्यंत, तसेच रोमान्स आणि विनोदावरही भाष्य केले आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील (Mumbai Bomb Blast) तो टाडाचा आरोपी आहे. अभिनेता संजय दत्तला (Sanjay Dutt) अबू सालेमने जी AK-56 रायफल दिली होती, त्यावेळी रियाज सिद्दीकी तिथे उपस्थित होता. मे 2003 मध्ये दुबईतून प्रत्यार्पण (Deport) झाल्यानंतर त्याला सीबीआयने अटक केली होती.

तुरुंगातील जीवन कवितेतून
आर्थर रोड तुरुंगात (Arthur Road Jail) कैद असताना रियाजने अनेक कविता लिहिल्या. आपल्या तुरुंगातील जीवनाचे चित्रण त्याने या ओळींमधून केले आहे. जेलमध्ये आल्यानंतर काय होतं. जेल कसं असतं. याचं वर्ण त्याने या कवितेतून केलं आहे. त्याची ही कविता आता समोर आली आहे. तो आपल्या कवितेत काय लिहीतो ते पाहा. 

तकदीर का देखो खेल कि भईया आ गये हम तो जेल

जेल के किस्से क्या क्या बताएं, जेल तो भईया जेल

बडे़ बड़ों की यहां पर आके हो जाती है बुद्धि फेल,

एक बार जो हत्थे चढ़ा इसके फिर पता न कब होगी बेल

तकदीर का देखो खेल कि भईया आ गये हम तो जेल

रियाजने तुरुंगाबाहेरच्या जीवनावरही आपली लेखणी चालवली आहे. ज्यावेळी तो तुरूंगाच्या बाहेर आला त्यानंतर ही त्याने आपली शायरी आणि कविता लिहीणे सुरूच ठेवले. ज्यावेळी तो जेलमधून बाहेर आला त्यावेळी त्याने टाटांनी बनवलेल्या नॅनो गाडीवरच कविता केली आहे. ही 'नॅनो कार' बाजारात आल्यावर त्याने काही ओळी लिहिलेल्या होत्या.

देख जमाना बदला देख, टाटा का निर्माण तो देख

इस महंगाई के मौसम में, एक लाख की नैनो देख

बरसों से ये ख्वाब था सबका, ख्वाब हुआ अब पूरा देख

ख्वाबों की ताबीर है नैनो, एक नया फिर ख्वाब तो देख

तो ऐवढ्यावर थांबला नाही. जसं त्याने जेलचं वर्णन करणारी कविता केली तसचं त्याने नॅनो कारवरही कविता केली. दाऊदचा हा हस्तक रोमॅन्टीक कविता करण्यात कुठेही मागे नव्हता. त्यने काही रोमॅन्टीक कविता ही केल्या आहेत.  

हम कैद में भी नगमा गर हैं याद में उसकी

बहला रहे हैं दिल को फक्त याद में उसकी

हर सुबह नई आस, नई सोच, नया जोश

हर शाम बुझा दिल है फकत याद में उसकी


रियाज याने जेलमध्ये असताना आपली आज ना उद्या सुटका हेईल यावर ही एक कविता लिहीली होती. या कवितेला त्याने  “कैदी परिंदे” असं नाव दिले होते. 

कैदी परिंदे पिंजरे में ये गाते हैं

कब छूटेंगे मौसम बीतते जाते हैं

फिर से टूट कर रोने की रुत आई है

फिर से दिलों के घाव ये बढ़ते जाते हैं

'डी कंपनी' आणि शायरीचा जुना संबंध
रियाजने 'याद में उसकी' या कवितेतून रोमान्सवरही आपली भावना व्यक्त केली आहे. तुरुंगातून सुटका होण्याची वाट पाहणारा 'कैदी परिंदा' (Prisoner Bird) या कवितेतून त्याचे दु:ख स्पष्ट होते. विशेष म्हणजे, 'डी कंपनी'ला शेरो-शायरीची आवड नवी नाही. दाऊदचा मृत भाऊ नूरा चित्रपटांसाठी गाणी लिहायचा. छोटा शकीलही आपल्या माशूकांना (Beloveds) खूश करण्यासाठी गालिबच्या भाषेचा वापर करत असे. रियाजच्या या कविता मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील त्याच्या वकील फरहाना शाह यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com