Beed Crime: हत्या की आत्महत्या? आधी वडील मग 3 वर्षांच्या चिमुकलीचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

बीडमधून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

आकाश सावंत, प्रतिनिधी

Beed Crime News : बीडमधून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील इमामपूर रोड परिसरात एका तीन वर्षांच्या चिमुकलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. चिमुरडीचे ओठ निळे-काळे झाले होते. हे दृश्य पाहून कुणाच्याही हृदयाचा ठोका चुकेल. धक्कादायक बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वी याच मुलीच्या वडिलांचा मृतदेह इमामपूर रोड परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर आता त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे. 

नेमकं काय घडलं? 

बीडजवळील इमामपूर रोड परिसरात एका तीन वर्षीय चिमुकलीला गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. दोन दिवसांपूर्वीच याच मुलीच्या वडिलांचा मृतदेह इमामपूर रोड परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर आता त्या चिमुरडीचा गळफास दिलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नक्की वाचा - Chhatrapati Sambhajinagar : 'घरी कधी येताय?' असं विचारणाऱ्या लेकीने घेतला गळफास, संभाजीनगरचा धक्कादायक प्रकार

दोन दिवसांपूर्वी जयराम बोराडे या व्यक्तीने इमामपूर रोड परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. बोराडे यांच्यासोबत त्यांची तीन वर्षांची मुलगी घरातून बाहेर निघाली होती. मात्र तिचा दोन दिवसांपासून शोध सुरू होता. आज सकाळी याच परिसरात एका झाडाला गळफास दिलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमागील कारण अद्यापही समजू शकले नसून ग्रामीण पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

Topics mentioned in this article