जाहिरात

Delhi Blast : दिल्ली बॉम्ब स्फोटाचे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य, मृतदेहांची भयाण अवस्था

Delhi Blast Heartbreaking Photos: दिल्लीच्या लाल किल्ल्यात झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीत शोककळा पसरली आहे.

Delhi Blast : दिल्ली बॉम्ब स्फोटाचे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य, मृतदेहांची भयाण अवस्था
Delhi Blast

Delhi Blast Heartbreaking Photos: दिल्लीच्या लाल किल्ल्यात झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीत शोककळा पसरली आहे. जो क्रूर चेहरा दिल्ली खूप वर्षांपूर्वीच विसरली होती, तोच चेहरा सोमवारी १० नोव्हेंबरला पुन्हा समोर आला. या बॉम्ब स्फोटात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी जाले आहेत. जेव्हा कधी अशा प्रकारचा ब्लास्ट होतो, त्यानंतर येणारे फोटो हृदय पिळवटून टाकणारी असतात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरुनही असेच फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. अनेकांनी बॉम्ब स्फोटात आपल्या नातेवाईकांना गमावलं आहे. या शोक वातावरणातील अनेक फोटो समोर आले आहेत. जे फोटो पाहून कोणाचंही हृदय पिळवटून निघेल. 

दिल्लीत राहणारे पंकज साहनी त्यावेळी लाल किल्ल्यावर उपस्थित होते. कारमध्ये ब्लास्टमध्ये त्यांच्या मुलाचं निधन झालं. मुलावर अंत्यसंस्कार करणं त्याला जड जात होतं. अनेकांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले आहेत. त्यांची ओळख पटवणं कठीण जात आहे. 

Latest and Breaking News on NDTV

लाल किल्ल्यावरील बॉम्ब हल्ल्यात जीव गमावणारे नौमानचे कुटुंबीय रुग्णालयाच्या बाहेर रडताना दिसत आहेत.  

Latest and Breaking News on NDTV

दिल्ली बॉम्ब हल्ल्यानंतर एक लहान मुलगी रडताना दिसत आहे. जे दृश्य पाहून कुणाच्याही डोळ्यात पाणी तरळेल. 

Latest and Breaking News on NDTV

आपलं नातेवाईक गमावल्याची माहिती मिळताच महिलाही अश्रू रोखू शकल्या नाहीत. असे अनेक फोटो रुग्णालय आणि लाल किल्ल्याच्या समोरील आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

आपल्या जवळील व्यक्ती गमावण्याचं दु:ख यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. 

Latest and Breaking News on NDTV

या बॉम्ब स्फोटाच्या संपूर्ण प्रकरणाचा तपास राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी करीत आहे. ज्यामध्ये अनेक गोष्टी समोर येत आहेत. संशयितांनी २६ जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर स्फोट घडवून आणण्याची योजना आखल्याचे सांगण्यात येत आहे.

Latest and Breaking News on NDTV

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com