जाहिरात

Car Fire : पेटत्या कारच्या काचा फोडल्या अन् चौघांना वाचवलं, उज्जैनला जाणाऱ्या कुटुंबासोबत नेमकं काय घडलं?

महादेव फंड यांनी प्रसंगावधान दाखवत कारच्या खिडकीच्या काचा फोडून कारमधील महिला आणि पुरूषांना ओढून बाहेर काढलं.

Car Fire : पेटत्या कारच्या काचा फोडल्या अन् चौघांना वाचवलं, उज्जैनला जाणाऱ्या कुटुंबासोबत नेमकं काय घडलं?
बुलढाणा:

अमोल गावंडे, प्रतिनिधी

बुलढाण्यात चालकाचं नियंत्रण सुटल्याने भरधाव कार दुभाजकाला धडकल्याने पेट घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारची पेट्रोलची  टाकी फुटल्याने काही कळायच्या आत कारने पेट घेतला. या अपघातात एकाचा कारमध्येमच जळून अक्षरश:  कोळसा झाला. तर परिसरातील नागरिकांनी कारमधील चौघांना बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला. ही घटना आज 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता घडली.

Hyderabad Crime : तुलसीला मिळालं मृतदेहाचं पार्सल..., बॅग उघडताच कुटुंब हादरलं!

नक्की वाचा - Hyderabad Crime : तुलसीला मिळालं मृतदेहाचं पार्सल..., बॅग उघडताच कुटुंब हादरलं!

अमरावती येथून खामगावमार्गे उज्जैनला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या भरधाव कार क्रमांक एमएच 24 एडब्ल्यू 7904 चा भीषण अपघात झाला. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव अकोला मार्गावरील हॉटेल सुदर्शनजवळ कारचा टायर फुटल्याने कारने  डिव्हायडरवर धडक दिली. या धडकेत कारच्या पेट्रोल टाकीचा भडका झाल्याने कारने पेट घेतला.

यावेळी परिसरातील नागरिकांनी धावपळ करत आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी कारमधील महिलांसह चौघांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले. मात्र त्यातील एकाला वाचवता आलं नाही आणि कारमधील चालकाचा जागीच जळून कोळसा झाला. (कारमधील दृश्य विचलित करणारी असून दाखविता येणार नाही)

मृतकाचे नाव अरूण बाबूराव चिंचणसुरे असं आहे. तर परूत अरुण चिंचणसुरे (36), आशिष अरुण चिंचणसुरे (32), लक्ष्मी अरुण चिंचणसुरे (61), शारदा पुणे (55) हे प्रवासी जखमी झाले आहे. जखमींना तातडीने खामगाव शहरातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

Kalyan Marathi Man Attack: यांचा माज कधी उतरणार? आधी घाणेरडे चाळे मग मराठी कुटुंबाला मारहाण

नक्की वाचा - Kalyan Marathi Man Attack: यांचा माज कधी उतरणार? आधी घाणेरडे चाळे मग मराठी कुटुंबाला मारहाण

खामगाव शहरातील महादेव फंड बनला देवदूत...
बुलढाणा जिल्ह्यातील अकोला-खामगाव बायपासवर कारचा अपघात झाल्याने सुदर्शन हॉटेलजवळ असलेले महादेव फंड यांनी क्षणाचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कारने पेट घेतला होता. महादेव फंड यांनी प्रसंगावधान दाखवत कारच्या खिडकीच्या काचा फोडून कारमधील महिला आणि पुरूषांना ओढून बाहेर काढले. त्यांच्या या धाडसी कार्याबद्दल सर्वजणं त्यांच कौतुक करीत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: