
नागिनंद मोरे, धुळे: धुळे जिल्ह्याच्या थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 5 मे रोजी शिरपूर-गरताड रोडलगत शेतात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. या खुनाचा उलगडा करत थाळनेर पोलीस व धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने चार संशयितांना अटक केली असून, तपासात खुनामागील व्यक्तिगत भांडणाचे धागेदोरे तपासादरम्यान समोर आले असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे.
(नक्की वाचा- Bhushan Gavai : न्यायमूर्ती भूषण गवई 52 वे सरन्यायाधीश, घेतली पदाची शपथ)
समोर आलेल्या माहितीनुसार, थाळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडेल्या अज्ञात मृतदेहाच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. आठ दिवसांच्या अथक तपासानंतर थाळनेर पोलीसांनी खुनाचा केला पर्दाफाश केला असून चार आरोपीना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सदर इसमाचा मृतदेह मिळाल्यानंतर सुरुवातीला त्याची ओळख पटविणे अत्यंत कठीण होते.
मात्र तपास अधिकारी सपोनि शत्रुघ्न पाटील यांच्या निरीक्षणात मृताच्या शर्टाच्या खिशात एक चुरगळलेली चिठ्ठी सापडली. ती पुन्हा जोडून व मोबाइल क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी मृताची ओळख उमेश ऊर्फ राहुल कंदारसिंह चौहाण (रा.उपला, ता. राजपूर, जि. बडवाणी, म.प्र.) अशी पटवली होती. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला.
नक्की वाचा - Justice BR Gavai : देशात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, भावी सरन्यायाधीश भूषण गवईंच्या आईंची मोठी मागणी
संशयित आकाश कैलास पावरा यास ताब्यात घेतल्यावर, त्याने दिलीप पावरा, घनदास ऊर्फ गुड्डू जाधव आणि एका विधीसंघर्षीत बालकासह मिळून हा खून केल्याची कबुली दिली. पुढील तपासात खुनाचे कारण म्हणून जुन्या वैयक्तिक भांडणाची कुरापतीतून हा खून केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. दरम्यान, थाळनेर पोलिसांनी मध्य प्रदेश व नरडाणा येथून एकूण तीन आरोपींना अटक केली असून, विधीसंघर्षीत बालकाबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी यावेळी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world