नागिंद मोरे, प्रतिनिधी
Dhule Shocking News : शिरपूर तालुक्यातील वाडीखू येथे धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका तरुणाने इन्स्टाग्रामवर 'गुड बाय' असं स्टेटस ठेऊन तापी नदिपात्रात उडी मारली. तरुणाने जीवन संपवल्यानं सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. उमेश राजेंद्र पाटीव (22) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. आज दुपारी ही भयंकर घटना घडली. उमेश पाटील हा घरातील एकुलता एक मुलगा होता. तो रोजगारानिमित्त सुरत येथील एका कंपनीत काम करत होता.दोन दिवसांपूर्वीच तो यात्रेनिमित्त त्याच्या गावी वाडी येथे आला होता.
उमेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आणि..
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी उमेशने पाटीलने इन्स्टाग्रामवर ‘गुड बाय' असं स्टेटस ठेवलं होतं. तापी नदीसोबतचा स्वतःचा सेल्फी फोटो स्टेटसवर अपलोड केला होता.पण उमेशनं आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल का उचललं?यामागचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. या
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तापी नदी पुलावर धाव घेतली. त्यानंतर उमेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आणि तो काढत शवविच्छेदनासाठी धुळे पाठवला, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
नक्की वाचा >> Navi Mumbai : मार्केटला जाण्याआधी सावध व्हा! नवी मुंबईत बुर्का गँगची एन्ट्री, सीवूडमध्ये सशस्त्र दरोडा, Video
रोजगारानिमित्त सुरत येथील एका कंपनीत नोकरी करायचा
उमेश पाटील रोजगारानिमित्त सुरत येथील एका कंपनीत काम करत होता. यात्रेनिमित्त दोन दिवसांपूर्वीच तो आपल्या गावी वाडी येथे आला होता. आत्महत्येपूर्वी उमेशने पाटील याने इन्स्टाग्रामवर ‘गुड बाय' असा तापी नदीसोबतचा स्वतःचा सेल्फी फोटो स्टेटस ठेवल्याचे समोर आले आहे. मात्र, आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
नक्की वाचा >> Domibivali News: काटई नाक्याजवळ MIDC ची मोठी जलवाहिनी फुटली! शहरात पाणी टंचाई होणार? Video पाहून धक्काच बसेल
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world