नागिंद मोरे, प्रतिनिधी
Dhule Crime News : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणि नंतर गुजरातकडे अवैधरित्या नेला जाणारा विदेशी दारूचा साठा धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB)पकडला आहे. पोलिसांनी जवळपास 40 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली असता आतमध्ये बिअरचे 400 बॉक्स आढळले. पोलिसांनी 15 लाख 36 हजार रुपये किमतीचे बिअरचे बॉक्स, 25 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा कंटेनर आणि 3 हजार रुपयांचा मोबाईल, असा एकूण 40 लाख 39 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी धुळे-जळगाव बायपास हायवेवर सापळा रचला
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावकडून धुळेमार्गे एका कंटेनरमधून विदेशी दारूची अवैध वाहतूक गुजरातच्या दिशेने केली जात होती. याबाबतची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धुळे शहरातील नवीन सिव्हिल हॉस्पिटल समोर असलेल्या धुळे-जळगाव बायपास हायवेवर सापळा रचला. त्यावेळी एक संशयास्पद कंटेनर (क्रमांक आर.जे.52/जी.ए.3630) तिथे आला.
नक्की वाचा >> दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पुण्यातील बड्या नेत्याचं मोठं विधान, म्हणाले, "अजितदादांची इच्छा.."
चालकाने पोलिसांना दिली उडवा उडवीची उत्तरे
त्यानंतर पोलिसांनी या कंटेनरला अडवला. त्याचदरम्यान, कंटेनर चालक अजय राजाराम वानखेडे (52) याची पोलिसांनी चौकशी केली. तो मध्य प्रदेशातील इंदौर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. चालक अजयने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.कंटेनरमध्ये स्पेअर पार्ट्स असल्याचं त्यानं सांगितलं. पण पोलिसांना संशय आल्याने त्यांनी कंटेनरची तपासणी केली. पोलिसांना या कंटेरनमध्ये बिअर'चे तब्बल 400 बॉक्स सापडले.
नक्की वाचा >>मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग रखडणार? भूसंपादन प्रक्रियेला स्थानिकांसह शेतकऱ्यांचा विरोध, काय आहेत मागण्या?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world