काका दारु पिऊन सतात शिवागाळ करत होता. हे पुतण्याला सहन झालं नाही. कुटुंबीयांना सतत होणाऱ्या शिवीगाळमुळे तो त्रासला होता. त्यातूनच त्याने काकाचा काटा काढण्याचं ठरवलं. त्यासाठी मित्राची मदत ही घेतली. काकाचा काटाही काढला. पण एक चुक त्याला महागात पडली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला. ही घटना धुळ्यात घडली आहे. पोलिसांनी एका छोट्या पुराव्याच्या आधारावर या प्रकरणाचा छडा लावत आरोपींना गजाआड केले आहे. धुळे पोलिसांनी काही तासात या खुनाचा शोध लावला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सईद फकीर हे विसरवाडी नंदूरबारचे रहिवाशी होते. त्याचं वय 28 वर्ष होतं. त्यांना दारूचे भयंकर व्यसन होतं. दारू प्यायल्यानंतर ते शिवीगाळ करत असतं. हे वारंवार होत असल्याने त्यांचा पुतण्या आवेश सलीम शहा याला त्यांच्याबाबत राग होता. नेहमी सांगूनही ते शिव्या देण्याचे सोडत नव्हते. अशा वेळी त्यांच्या शिव्या कायमच्या बंद करण्याचा निर्णय आवेश याने घेतला. त्यांनी आपला मित्र सोहेल उर्फ बबलू मुबारक शहा याला या कटात सहभागी केलं.
7 जानेवारीला काका सईद फकीर हे पुतण्या आवेश याच्या गॅरेजवर आले होते. त्यावेळी आवेशने आपला मित्र सोहेल याला बोलवून घेतलं. त्यानंतर एका स्विफ्ट कारमध्ये काका सईद यांना बसवलं. ही कार ते साक्री तालुक्यातील सुरत नागपूर महामार्गावरील कोंडाईबारी घाटात घेवून गेले. त्यानंतर गाडीतच आवेशने काकाचे काळ्या रुमालाने तोंड दाबले. त्यांचा श्वास बंद झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. नंतर त्यांचे हातपाय बांधण्यात आले. त्याच अवस्थेत त्यांना दरीत फेकून देण्यात आले.
दरीत फेकल्यानंतर आवेश आणि सोहेल हे तिथून पळून गेले. दुसऱ्या दिवशी पोलिसांना सईद फकीर यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी पहिल्या मृताची ओळख पटवली. त्यातून ते सईद फकीर असल्याचे समोर आल्या. त्यांच्या मृतदेहा जवळ एक काळा रूमाल सापडला. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. तपासामध्ये अशा पद्धतीचा रुमाल त्यांचा भाचा आवेश वापरत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी चौकशीसाठी आवेशला ताब्यात घेतलं.
ट्रेंडिंग बातमी - Nashik Crime : नाशिकमध्ये 23 वर्षीय तरुणाचा नायलॉन मांजाने गळा चिरून मृत्यू
पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तो रुमाल आपलाच असल्याचे आवेशने कबुल केले. शिवाय आपणच आपल्या काकाचा मित्राच्या मदतीने खुन केल्याचेही त्याने कबुल केले. या खुनाचा धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि साक्री पोलिसांनी संयुक्त पणे तपास केला. काका नेहमी दारू पिऊन अश्विल शिवागाळ करत असे. त्या रागातून आपण हे कृत्य केल्याचे आवेशने पोलिस तपासात सांगितले. यात अजून काही आहे का याचा ही तपास होत असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world