एक वृद्ध दांम्पत्याने आपल्या घरात स्वत:चे जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आम्हाला कुणाच्या दयेवर जगायचं नाही असं त्यांनी आत्महत्या करण्या पूर्वी लिहून ठेवलं आहे. पण हे करण्या मागचं कारण ज्या वेळी समोर आलं त्यावेळी सर्वच जण हादरून गेले आहेत.ही घटना बेळगावमध्ये घडली. विशेष म्हणजे आत्महत्या करणारे हे निवृत्त सरकारी अधिकारी आहेत. या घटनेचं सत्य जेव्हा समोर आले त्यावेळी सगळीकडे खळबळ उडाली आहे. पोलिस ही या प्रकरणानंतर चक्रावून गेले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही घटना कर्नाटकातल्या खानापूरच्या बीडी या गावात घडली आहे. या गावात डियोगजेरॉन संतन नाजरेथ याचं वय 82 वर्ष होतं. तर त्यांची पत्नी फ्लेवियाना वय वर्ष 79 यांच्यासह राहात होते. त्यांनी आत्महत्या करण्या पूर्वी एक पत्र लिहीले आहेत. त्यात त्यांनी आपल्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार धरू नये असं ही लिहीलं आहे. शिवाय आपण हे पाऊल यासाठी उचलत आहोत की आम्हाला कुणाच्या दयेवर जगायचे नाही. या दाम्पत्याला मुल-बाळ नाही. ही घटना गुरूवारी समोर आली. ज्यावेळी शेजारच्यांनी फ्लावियाना यांनी मृत अवस्थेत पाहीलं. तर डियोगजेरॉन यांचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला.
डियोगजेरॉन हे महाराष्ट्र सरकारचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांनी आपल्या गळ्यामध्ये चाकू मारून आत्महत्या केली. त्यांच्या हातावरही जखमा होत्या. तर फ्लावियाना यांनी विष घेतलं होतं. शवविच्छेदन रिपोर्ट आल्यानंतर यावर अधिक प्रकाश पडणार आहे. मात्र या पत्रात अशी एक गोष्ट पोलिसांच्या नजरेत पडली. त्यात त्यांनी दोन व्यक्तींची नावं लिहीली आहेत. एक म्हणजे सुमित बिर्या आणि अनिल यादव. ही दोन नावे ऐकून पोलिस सतर्क झाले. त्यांनी पुढे काय लिहीले आहे याचा आढावा घेतला.
त्या पत्रात लिहील होते की बिर्या या व्यक्तीने आम्हाला फोन केला होता. आपण दिल्लीतून टेलिफोन विभागाचा अधिकारी असल्याचे त्यांने सांगितले. त्याने सांगितले की तुमच्या नावावर एक सीमकार्ड घेतले गेले आहे. त्याचा उपयोग चुकीच्या गोष्टींसाठी केला गेला आहे. त्यानंतर त्याने तो फोन अनिल यादव या व्यक्तीकडे दिला. त्याने आपण क्राईम ब्रांचचा अधिकारी असल्याचा दावा केला. त्याने डियोगजेरॉन यांच्या संपत्तीची माहिती मागवली. शिवाय सीम कार्डचा जो काही चुकीचा वापर झाला आहे त्याचे परिणाम भोगण्याची धमकी दिली. शिवाय प्रकरण मिटवण्यासाठी 50 लाखांची मागणी ही केली.
ट्रेंडिंग बातमी - 100 years of RSS : संघाचा राजकारणाशी संबंध आहे का? संघ अभ्यासकांचं काय आहे मत?
त्यानंतर प्रचंड घाबरलेल्या या दाम्पत्याने त्यांना 50 लाख रुपये त्यांच्या अंकाऊंट मध्ये हस्तांतरीत केले. त्यानंतर ही ते पैशांची मागणी करतच होते. त्यातुन त्यांनी सव्वा सात लाख रुपयांचे गोल्ड लोन ही घेतले. असा उल्लेख या पत्रात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आपण 82 वर्षाचे आहोत तर पत्नी 79 वर्षांची आहे. आम्हाला कुणाचा ही आधार नाही. आम्हाला कुणाच्या ही दयेवर जगायचे नाही. त्यामुळे आम्ही आत्महत्या करत आहोत. आमचे मृतदेह विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देण्यात यावेत. असं त्यांनी लिहीलं आहे. हे प्रकरण डीजिटल अरेस्टचे असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. याबाबत तपास करत असल्याचं ही त्यांनी सांगितलं.