
निलेश बंगाले, प्रतिनिधी
Wardha News : सौरऊर्जेचे महत्त्व जाणून वर्ध्यातील आर्वी तालुक्यातील नेरी (पुनर्वसन) या गावाने राज्यातील सर्वात मोठं सौरग्राम होण्याचा मान मिळविला आहे. वर्धातील नेरी मिर्झापूर गाव राज्यातील पहिले 100 टक्के सौरग्राम ठरलं आहे. या गावातील 100 टक्के घरांवर सौर ऊर्जेचे पॅनल पाहायला मिळते. त्यामुळे गावातील नागरिकांचं बिल चक्क शून्यावर येऊन ठेपलं आहे. 'गाव करी ते राव न करी' या म्हणीचा प्रत्यय आणून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एकी आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ही किमया करून दाखविली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वर्धा शहरापासून 50 किमी तर आर्वीपासून अवघ्या 2 किमी अंतरावर असलेले आणि महावितरणच्या आर्वी उपविभागांतर्गत असलेल्या नेरी (पुनर्वसन) या गावाला सौरग्राम करण्यासाठी आर्वी पंचायत समितीने या गावात जवळपास वर्षभर सूर्यप्रकाशाचा वापर करून वीजनिर्मिती करणाच्या मानस केला. सौरऊर्जेच्या प्रकाशात झळकणाऱ्या या गावात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ही किमया साध्य करणाऱ्या या गावाने संपूर्ण राज्यापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
नक्की वाचा - Crime News : झोपेतच पत्नीच्या डोक्यात घातली कुऱ्हाड, एक चूक अन् सुखी संसाराची राख रांगोळी !
मिर्झापूर (नेरी) या गावाला सौरग्राम करण्यासाठी आर्वी पंचायत समितीने केंद्र शासनाच्या ‘पंतप्रधान सुर्यघर' – मोफत वीज योजनेत सहभागी होण्याचा प्रस्ताव तयार करून वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला. यासाठी स्थानिक आमदार सुमीत वानखडे यांनी मोलाची भूमिका बजावत शासनदरबारी विशेष प्रयत्न केले. जिल्हाधिकारी कार्यालयाने देखील त्यास अनुकूल प्रतिसाद देत जिल्हा नियोजन समितीने प्रस्तावास मान्यता दिली गावकरी, पंचायत समिती आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या एकत्रित प्रयत्नांतून गावचे 100 टक्के सौर उर्जाकरण एकजुटीने यशस्वी केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world