जाहिरात

इटलीला फिरायला गेलेल्या Divyanka Tripathi सोबत घडली भयंकर घटना

प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही नवऱ्यासोबत फिरायला इटलीला गेली आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हे दोघे फिरायला गेले होते. तिथेच त्यांच्यासोबत ही भयंकर घटना घडली आहे.

इटलीला फिरायला गेलेल्या Divyanka Tripathi सोबत घडली भयंकर घटना
मुंबई:

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीसोबत एक भयंकर प्रकार घडला आहे. दिव्यांका आणि तिचा नवरा विवेक दहिया हे दोघे लग्नाच्या वाढदिवसानिमित्त फिरण्यासाठी इटलीला गेले आहेत. तिथेच त्यांच्यासोबत ही भयंकर घटना घडली आहे. लग्नाच्या आठव्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे दोघे फिरायला गेले आहेत. युरोपात फिरत असताना या दोघांचे पासपोर्ट आणि 10 लाख रुपये चोरी करण्यात आले. 

दिव्यांकाने एका मुलाखतीमध्ये सांगितले की आमची ट्रीप खूप छान झाली. आम्ही फ्लोरेंसला राहायला आलो होतो. कोणत्या हॉटेलमध्ये थांबायचे हे पाहण्यासाठी आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो होतो. आम्ही गाडी पार्क केली होती आणि आमचे सगळे सामानही गाडीतच होते. हॉटेलबुक झाल्यानंतर आम्ही जेव्हा सामान आणण्यासाठी गेलो तेव्हा आम्हाला कळालं की आमचं सगळं सामान चोरीला गेलं आहे. आमचे पासपोर्ट, 10 लाख रुपये आणि इतर जे काही होतं ते सगळं चोरून नेण्यात आलं. गाडीच्या खिडकीची काच तोडून हे सामान चोरण्यात आलं होतं. आम्ही स्थानिक पोलिसांत धाव घेतली मात्र त्यांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. दिव्यांकाने सांगितलं की सीसीटीव्ही नसेल तर आम्ही काहीही मदत करू शकत नाही असे पोलिसांनी आम्हाला सांगितले. 

सदर घटनेबाबत बोलताना दिव्यांकाचा नवरा विवेकने म्हटले की, 'पोलिसांनी घटनास्थळी जाऊन साधी पाहणीही केली नाही. पोलीस स्टेशन 6 वाजता बंद होते. त्यानंतर तेथे सुनावणी होत नाही. आम्ही दूतावासात जाण्याचाही प्रयत्न केला, पण तोही बंद असल्याचे आढळले. विवेकने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये, कारचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये कारची काच पूर्णपणे तुटलेली दिसत आहे. गाडीची अवस्था पाहता चोरटे सामान अवघ्या काही सेकंदात घेऊन पळून गेले असावेत हे स्पष्टपणे दिसत आहे.  

दिव्यांकाने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करताना म्हटले की ती आणि तिचा नवरा विवेक हे दोघेही सुखरूप आहेत. आम्ही सुखरूप असलो तरी आमचा पासपोर्ट, आणि अन्य महत्त्वाच्या वस्तू चोरीला गेल्या आहेत. आम्हाला दूतावासाकडून मदतीची अपेक्षा आहे. दिव्यांका आणि विवेकसोबत युरोपमध्ये घडलेल्या प्रकारामुळे या दोघांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. हे दोघेही सुखरूप भारतात परतावेत यासाठी ते प्रार्थना करत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com