अटल सेतूवरुन उडी मारुन डॉक्टर महिलेची आत्महत्या

फोटो काढायचा असल्याचं सांगून महिलेने अटल सेतूवर टॅक्सी थांबवली आणि उडी मारून आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मुंबईतील (Mumbai Crime News) एका 43 वर्षीय महिलेने  शिवडी-न्हावाशेवा अटल सागरी सेतूवरुन उडी मारून स्वत:चाच जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  फोटो काढायचा असल्याचं सांगून महिलेने अटल सेतूवर (Atal Setu) टॅक्सी थांबवली आणि उडी मारून आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. 

टॅक्सी चालकाने याबाबत पोलिसांना सूचना दिल्यानंतर तत्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र अद्याप महिलेचा शोध लागलेला नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे. ही महिला व्यवसायाने डॉक्टर असून ती आपल्या वृद्ध आई-वडिलांसोबत राहत होती. डॉ. किंजल शहा असं महिलेचं नाव आहे. गेल्या दहा वर्षांपासून महिला डिप्रेशनमध्ये होती. यातूनच तिने टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.किंजल या दादरच्या नवीन आशा इमारतीत त्यांच्या कुटुंबीयांसह राहत होत्या. बाहेर काम आहे असं सांगून त्या रविवारी घरातून सकाळी निघाल्या होत्या. त्यानंतर अटल सेतूवर येऊन त्यांनी समुद्रात उडी घेतली.  घरातून निघताना तिने सुसाइड नोट लिहिली होती, यात तिने अटल सेतूवरुन आत्महत्या करणार असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. 

अटल सेतूवरुन घेतला युटर्न...
अटल सेतूवर गेल्यानंतर किंजल यांनी टॅक्सी चालकाला पुन्हा टॅक्सी मुंबईच्या दिशेने वळवायला सांगितली. त्यानुसार, चालकाने टॅक्सी माघारी वळवली. यानंतर किंजल यांनी  चालकाला टॅक्सी बाजूला थांबवण्यास सांगितली. मात्र टॅक्सी चालकाने नकार दिला. अखेर किंजलने त्याला कसं-बसं करून टॅक्सी थांबवण्यास भाग पाडलं आणि संधी साधत किंजल यांनी समुद्रात उडी घेतली. न्हावा शेवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅरिकेडिंगचे काम सुरू होते तिथूनच महिलेने उडी घेत आत्महत्या केली. 

Topics mentioned in this article