स्वप्नात हत्या झाल्याचे पाहिले, पोलिसांना सांगितले, घटनास्थळी जाताच पोलीसही चक्रावले

त्यांनी पोलीसांना सांगितले की मला एक वारंवार स्वप्न पडत आहे. त्या स्वप्नात एक पुरूषाचे प्रेत खेड रेल्वे स्टेशनच्या डोंगरात असल्याचे दिसते.

Advertisement
Read Time: 3 mins
रत्नागिरी:

राकेश गुडेकर 

एका हत्येचा उलगडा एका स्वप्नामुळे झाल्याची चक्रावून टाकणारी घटना रत्नागिरीत घडली आहे. योगेश पिंपळ आर्या  यांना एक स्वप्न पडले. त्यात एका व्यक्तीची हत्या केली जात असल्याचं त्यांनी पाहिलं. ही माहिती त्यांनी तातडीने खेड पोलीस स्थानकात जावून दिली. पोलीसांनी ही त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून संबधीत जागी जावून तपासणी केली. तपासणी करताना पोलीसांनी तिथे जावून जे पाहीले ते त्यांना वेड लावणारेच होते. त्याने ते हबकून गेले. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

योगेश आर्या हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांवतवाडीच्या आजगावचे रहिवाशी आहेत. 17 सप्टेबरला ते तातडीने सावंतवाडीतून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड इथे पोहचले. तिथून त्यांनी थेट पोलीस स्थानक गाठले पोलीसात जावून त्यांनी एक धक्कादायक माहिती पोलीसांना दिली. त्यांनी पोलीसांना सांगितले की मला एक वारंवार स्वप्न पडत आहे. त्या स्वप्नात एक पुरूषाचे प्रेत खेड रेल्वे स्टेशनच्या डोंगरात असल्याचे दिसते. शिवाय मला मदत करा अशी याचनाही तो करत आहे. असे त्यांनी पोलीसांना सांगितले. या वर विश्वास ठेवावा की नाही असा प्रश्न पोलीसांना पडला. त्यानंतर त्यांनी एकदा तपासणी करण्याचे ठरवले. 

ट्रेंडिंग बातमी -  भाजपचा अंतर्गत सर्वे, पक्षानं घेतला धसका? चाणक्य मैदानात उतरणार

त्यानंतर पोलीसांनी आर्या यांना घेवून त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी गेले. हे ठिकाण भोस्ते घाट होते. इथे जंगल परिसर आहे. त्यांनी सांगितलेल्या वर्णनावरून ते त्या ठिकाणी पोहोचले. तिथे एक आंब्याचे झाड होते. झाडाजवळ कुजल्याचा वास येत होता. पोलीसांनी जवळ पाहिल्यावर त्यांना आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर व प्लास्टिकच्या पट्टया बांधलेल्या दिसल्या. शिवाय तिथे एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत खाली पडलेले दिसले. त्याने गळफास घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. 

ट्रेंडिंग बातमी - 'सिल्लोड आहे की पाकिस्तान , इथं राहायचं की...' दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य, वाद पेटणार?

त्याच्या अंगात राखाडी रंगाचे जॅकेट होते. राखाडी रंगाची पँट आणि या पोषाखाच्या आत मानवी हाडे असल्याचे दिसून आले. या मृतदेहाच्या पायाजवळच काळ्या रंगाची आदिदास लिहिलेली सॅक सापडली. तर मृतदेहापासून 5 फुटावर एक कवटी सापडली. मृतदेहाच्या दोन्ही ढोपराजवळ एआयआर कंपनीचे कळ्या रंगाचे बूट सापडले. मात्र या व्यक्तीची ओळख पटेल असे कोणतेही साहित्य पोलीसांना सापडले नाही. हे सर्व पासून पोलीस चक्रावून गेले आहेत. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात याचा तपास खेड पोलीस आता करत आहेत.  

ट्रेंडिंग बातमी - 'तिरूपती बालाजीच्या लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी' मुख्यमंत्र्यांच्या आरोपाने खळबळ, प्रकरण काय?

मात्र मृतदेहाची अवस्था पाहता तो बरेच दिवसाचा असावा असे सांगण्यात आले आहे. दरम्यान मृतदेह रत्नागिरीत आणि स्वप्न पडणारी व्यक्ती सिंधुदुर्गात. त्यानंतर ती व्यक्त खेडमध्ये येते त्यानंतर ती पोलीसांना स्वप्नाची माहिती देते. पोलीस विश्वास ठेवून तिथे जातात आणि त्यांना तिथे मृतदेह ही मिळतो. एका चित्रपटाला शोभेल अशी ही कथा वाटत असली तरी ही घटना सत्यात घडली आहे. त्यामुळे या हत्येचं म्हणा किंवा आत्महत्यचं त्याच बरोबर त्या स्वप्नाचं गुढही वाढलं आहे.