तिरूपती बालाजीचे जगभरात भक्त आहेत. मोठ्या संख्येने भाविक इथं दर्शनासाठी येत असतात. तिरूपती बालाजीबाबत अस्था असणारे अनेक भक्त येत असतात. इथं येणारे भाविक हे इथला लाडूचा प्रसाद घेतल्या शिवाय जात नाहीत. रोज इथं जवळपास 3 लाख लाडू बनवले जातात. त्यासाठी जवळपास 10 हजार किलो तूप वापले जाते. त्यातून बनणारे लाडू हे प्रसाद म्हणून भाविकांना दिले जातात. मात्र या लाडू प्रसादाबाबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी धक्कादायक विधान केले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी जे वक्तव्य केले आहे त्यामुळे मोठा वादंग निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तिरुपती बालाजीला दिल्या जाणाऱ्या लाडू प्रसादामध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी मिसळली जात होती. हा प्रकार जगनमोहन रेड्डी यांचे सरकार असताना होत होता असा धक्कादायक आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. जगन सरकारच्या काळात प्राण्यांची चरबी मिसळली जात होती. त्यातून मंदिराच्या पावित्र्याला धक्का पोहोचला आहे. ते पुन्हा राखलं जाण्याची ग्वाही नायडू यांनी दिली आहे.
चंद्राबाबूंनी हे आरोप करताना सांगितले की तिरूपतीच्या व्यंकटेश्वरांचा प्रसाद बनवण्यासाठी 'पुअर क्वालिटी' सामान वापरलं जात होतं. मात्र जगन मोहन यांचे सरकार आल्यानंतर त्याला हरताळ फासला गेला. सर्वात आधी या सरकारने तूप पुरवठा करणारं कंत्राट हे खाजगी संस्थेला दिले. या आधी नंदीनी या संस्थे मार्फत तूप पुरवठा केला जात होता. या तूपातूनच लाडू बनवले जात होते. मात्र जी खाजगी कंपनी जगन सरकार काळात तूप पूरवठा करत होती त्यांनी त्यात प्राण्यांची चरबी मिसळली असा आरोप नायडू यांनी केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - एक देश एक निवडणूक! राज ठाकरेंनी उपस्थित केले प्रश्न अनेक
तिरुमला तिरुपती देवस्थान आणि लॉर्ड व्यंकटेश्वरा ही आंध्र प्रदेशच्या लोकांची संपत्ती आहे. मोफत दिल्या जाणाऱ्या फुडची गुणवत्ताही ढासाळली आहे. आधीच्या वायएसआर सरकारनं लॉर्ड व्यंकटेश्वराचे लाडूही सोडले नाहीत. ज्या तूपात लाडू बनवले जायचे, त्या तुपात प्राण्यांची चरबीही जगन सरकार मिसळायचं काम केलं आहे. मात्र आपण या सर्व गोष्टी ठिक करणार आहोत. आपल्या सरकारने तूप पुरवठा करणाऱ्या खाजगी कंपनीला दूर केलं आहे. नंदीनी या संस्थे मार्फतच आता तूप घेतलं जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान नायडू यांचे हे आरोप वायएसआर काँग्रेसने फेटाळून लावले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world