Palghar News: वसईच्या 'या' बीचवरील रिसॉर्टमध्ये थरारक घटना, पार्टीत दारुड्याने केलं मोठं कांड, पोलिसही हादरले

वसईतील कळंब बीचवरील एका रिसॉर्टमधील पार्टीत मद्यधुंद पर्यटकाने बेकायदेशीर गावठी पिस्तूलातून हवेत गोळीबार करत एकच खळबळ उडवून दिली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Palghar Vasai Kalamb Resort Open Firing Case

Vasai Crime News Today : वसईतील कळंब बीचवरील एका रिसॉर्टमधील पार्टीत मद्यधुंद पर्यटकाने बेकायदेशीर गावठी पिस्तूलातून हवेत गोळीबार करत एकच खळबळ उडवून दिली.मात्र गोळीबाराचा आवाज ऐकत गस्तीवरील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.जप्त करण्यात आलेले पिस्तूल आरोपीकडे कसे आले?याचा तपास आता अर्नाळा सागरी पोलीस करत आहेत.वसईतील कळंब बीचवरील तुलसी रिसॉर्टमध्ये मंगळवारी मध्यरात्रीनंतर मद्याच्या नशेत 'हर्ष फायरिंग'करणाऱ्या पर्यटकाला अर्नाळा सागरी पोलिसांनी अटक केली आहे.अटक करण्यात आलेला संदेश गुरव हा भिवंडी येथील रहिवासी असून तो मित्रांसह रिसॉर्टमध्ये पार्टीसाठी आला होता.

पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि..

पार्टी दरम्यान अतिउत्साहाच्या भरात संदेश गुरव याने स्वतःजवळील बेकायदेशीर गावठी पिस्तुलातून हवेत एक गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकत गस्तीवरील बीट मार्शलने तात्काळ रिसॉर्टमध्ये धाव घेतली. सुरुवातीला उपस्थितांनी गोळीबार झालाच नसल्याचे सांगत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.मात्र घटनास्थळी पाहणी करताना पोलिसांना एक रिकामे काडतूस आढळून आले.त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत संदेश गुरव यानेच हवेत गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले. 

Advertisement

नक्की वाचा >> Maharashtra Rain : महाराष्ट्रातील 'या' सात जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार, वाचा IMD अलर्ट

बेकायदेशीर गावठी पिस्तूल आणि काडतुसे जप्त

अर्नाळा सागरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडील बेकायदेशीर गावठी पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली आहेत.आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 125 तसेच शस्त्र अधिनियम कलम 3/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी संदेश गुरव हा भिवंडी येथे बिल्डिंग मटेरियल सप्लायर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.त्याचे गुन्हेगारी पार्श्वभूमीशी काही संबंध आहेत का,तसेच हे बेकायदेशीर शस्त्र त्याच्याकडे कुठून आले, याचा सखोल तपास अर्नाळा सागरी पोलीस करत आहेत.

नक्की वाचा >> Manoj Jarange: 'एकतर सरकार निर्णय घेईल, नाहीतर मी..', दिल्लीत मराठा आंदोलन पेटणार? मनोज जरांगेंचा मोठा इशारा