Mahadev Betting App Scam : महादेव सट्टा अॅप घोटाळा प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणाच्या रडारवर आता देशातील अनेक हाय-प्रोफाईल नावं आहेत.उद्योगती विकास गर्ग यांना अटक केल्यानंतर ईडीने बिग बॉस रिअॅलिटी शो कंटेस्टंट आणि टीव्ही होस्ट शेफाली बग्गाची अनेक तास चौकशी केली.या दरम्यान शेफालीने मोठा खुलासा केला. तिने म्हटलं की,सट्टा अॅप प्रमोशनची डील वडील सांभाळायचे.पैशांच्या व्यवहाराची जबाबदारीही त्यांच्याकडे होती.30 मे रोजी ईडीने शेफालीच्या दिल्ली येथील घरावर छापा टाकला होता. यावेळी एजन्सीने 30 लाख रूपये जप्त केले होते.
हे पैसे महादेव सट्टा अॅपच्या प्रमोशनमधून कमावले होते, असा ईडीचा आरोप आहे.त्यानंतर ईडीने शेफाली बग्गाला नोटिस धाडली आणि तिची चौकशी केली.महादेव सट्टा अॅप घोटाळ्याबाबत वेगाने तपास यंत्रणांकडून वेगाने तपास सुरू आहे.ईडीने मोठी कारवाई करत विकास गर्ग यांच्या 907.44 कोटी रुपयांच्या संपत्तीची चौकशी सुरू केली आणि गर्ग यांना अटक केली. त्यानंतर शेफाली बग्गा ईडीच्या रडारवर आली.
नक्की वाचा >> Palghar News: वडघर येथे पूल कोसळला, दोन वाहने पुलाखाली पडली, अपघाताचा व्हिडीओ पाहून थरकापच उडेल
परदेशी कंपन्यांमध्ये 1100 कोटींची गुंतवणूक
सूत्रांच्या माहितीनुसार,ईडीच्या रिमांडवेळी विकास गर्ग यांनी महादेव सट्टा अॅपशी जोडलेले अनेक खुलासे उलगडले. त्यानंतर ईडीने उद्योग, खेळ आणि राजकारणाशी जोडलेल्या देशातील 10 हून अधिक मोठ्या सेलिब्रिटींना नोटिस पाठवली. या बेकादेशीर सट्टेबाजीवरून जवळपास 1100 कोटी रूपये परदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली.
विकासचा भाजप नेत्यांसोबत कनेक्शन
विकास गर्ग यांच्या अटकेनंतर छत्तीसगडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री भूपेश बघेलन यांनी या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, आमच्या सरकारने या प्रकरणाची सर्वात पहिली कारवाई छत्तीसगढमध्ये केली होती. आम्ही एफआयआर नोंदवली. त्यानंतर विकास गर्गला पकडलं. तो कोणाच्या संपर्कात आहे, याची चौकशी झाली पाहिजे.कारण भाजपच्या बड्या नेत्यांसोबत त्याचे संबंध आहेत.
नक्की वाचा >> Dombivli News: डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरण!रमेश म्हात्रेंसह त्यांच्या तीन कार्यकर्त्यांना मोठा दणका,जामीन रद्द
भुपेश बघेल यांच्या आरोपांवर छत्तीसगढचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री विजय शर्माने पलटवार केलं आहे.त्यांनी म्हटलं,जो कोणी चुकीचं करेल,त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल.जर या प्रकरणाशी संबंधीत कोणीही व्यक्ती भाजपसोबत जोडलेला असेल,तर त्याच्यावरही कठोर कारवाई केली जाईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world