Vasai News: काल निरोप समारंभ आज ED ची धाड! माजी महापालिका आयुक्तांच्या घरात घबाड सापडलं?

त्याच वेळी या प्रकरणात तत्कालीन महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर संशयाची सुई वळली होती.

जाहिरात
Read Time: 3 mins
वसई:

मनोज सातवी 

वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानी ED चा छापा पडला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काल 28 जुलैला त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यास सर्व राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यालयातले कर्मचारी हजर होते. त्यामुळे सर्व सामान्यांची गैरसोयही झाली होती. याच  अनिलकुमार पवार यांची  ED कडून वसईतील शासकीय निवासस्थानी सकाळी सात वाजल्यापासून कसून चौकशी सुरू आहे. मात्र चौकशी सुरू असताना ईडीने अनिलकुमार पवार यांची मुलगी आणि त्यांच्या पत्नीला वेगवेगळ्या गाडीतून घेऊन गेले आहेत. पत्नी आणि मुलीला नेमके कुठे नेलं आहे याबाबत गोपनीयता ठेवण्यात आली आहे. तर  माजी आयुक्त अनिलकुमार पवार हे बंगल्यात असून त्यांची चौकशी सुरू आहे. 

नक्की वाचा - Eknath Khadse: '7 जण एका खोलीत बसले म्हणजे...' जावयाच्या अटकेनंतर खडसेंनी विचारला रेव्ह पार्टीवर प्रश्न

आयुक्त असताना त्यांच्यावर वेगवेगळे आरोप केले गेले आहेत. त्यांची कारकीर्द ही वादग्रस्त ठरली आहे. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अवैध आणि  बेहिशेबी माया जमवली असल्याचा आरोप आहे. त्यांनी 250 ते 200 इमारतींना Off line CC दिल्याची माहिती ही समोर येत आहे. बदली झाल्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अनेक फाइल मंजूर केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. या अगोदर नालासोपारा येथील 41 अनधिकृत इमारती प्रकरणी नगररचना विभागाचे बडतर्फ उपसंचालक Y S Reddy  यांच्या वसई विरारसह हैदराबाद येथील घरावर ED ने 14 मे रोजी छापा टाकला होता. त्यामध्ये मौल्यवान दागिने आणि 11 कोटींची रोख रक्कम असा तब्बल 33 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्याच वेळी या प्रकरणात तत्कालीन महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर संशयाची सुई  वळली होती. आता त्यांच्यावर ईडीने धाड टाकली आहे. 

नक्की वाचा - Exclusive: पहलगामचे हल्लेखोर अमरनाथमध्ये करणार होते मोठा हल्ला, 'महादेव' ठरले त्यांचा काळ

वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या जाहिर (ज्ञात) मालमत्तेचा तपशील

1. नाशिक जिल्ह्यातील शेती जमीन आणि फार्म हाऊस
* स्थान:  बागलाण तालुक्यातील सटाणा जळील खामताणे गाव, नाशिक जिल्हा.
* क्षेत्रफळ: 0.41 हेक्टर व 0.45 हेक्टर जमीन, एक छोटे फार्म हाऊस (400 चौरस फूट).
* स्रोत: स्वतःच्या नावाने खरेदी.

2. बागलाण (नाशिक) येथील बिगरशेती जमिनी
* गाव: आरई, तालुका बागलाण. 
* एकूण  तिन भूखंड (Plot)

* Plot 1: ₹3,22,560 (सरकारी मूल्यांकन), बाजारभाव ₹60 लाख.
* Plot 2: ₹1,44,000 (सरकारी मूल्यांकन), बाजारभाव ₹22 लाख.
* Plot 3: ₹45 लाख बाजारभाव.
* नावावर: दिवंगत माता – सौ. निर्मलाबाई खंदेराव पवार.

3. नाशिक तालुक्यातील बिगरशेती भूखंड
* गाव: पाथर्डी, भूखंड क्रमांक 244/39.
* क्षेत्रफळ: 413.25 चौ.मी.
* सरकारी मूल्यांकन: ₹1,42,900/-
* बाजारभाव: ₹50 लाख.
* संपत्तीचे मूळ मालक: पुतण्या तुषार विजय पवार.
* हस्तांतरण: पुतण्याने आजी – निर्मलाबाई पवार यांना भेट दिले, नंतर त्यांच्या इच्छेनुसार अनिलकुमार पवार यांना दिले.

Advertisement

4. पुण्यातील फ्लॅट (Flat No. 402)
* स्थान: DSK हरियाळी मोदी बाग, शिवाजीनगर, पुणे.
* क्षेत्र: 120 चौ.मी. + 60 चौ.मी. पार्किंग (एकूण 180 चौ.मी.).
* खरेदी किंमत: ₹77 लाख.
* बाजारमूल्य: ₹1.94 कोटी.
* संपत्ती प्राप्तीचा स्रोत: आईला नातवाने दिलेले गिफ्ट, त्यानंतर आईने वसीयत करून अनिलकुमार यांना दिले.

5. सटाणा येथील दुसरा फ्लॅट (Flat No. 403)
* क्षेत्रफळ: 50 चौ.मी. + 45 चौ.मी. टेरेस (एकूण 95 चौ.मी.).
* खरेदी किंमत: ₹28 लाख.
* सध्याचे बाजारमूल्य: ₹30 लाख.
* संपत्तीचे नाव: अरुण खंदेराव पवार (भाव).
* वाटप पद्धत: कुटुंबीयांच्या सहमतीने अनिलकुमार यांना गिफ्ट.

Advertisement