रामराजे शिंदे
गुरूग्राम येथील एकम न्याय फाऊंडेशनने पुरूषांच्या हत्या आणि आत्महत्या संदर्भात एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात 2023 या वर्षात पत्नीच्या छळाला कंटाळून किती पतींनी आत्महत्या केली यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. शिवाय पत्नीनं पतींची हत्या केल्याच्या घटना, हनी ट्रॅपमध्ये पुरूषांना अडकवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या घटनांचा अभ्यास यात केला आहे. एकम न्याय फाउंडेशनच्या दिपीका नारायण भारद्वाज यांनी हा अहवाल तयार केला आहे. या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हा अहवाल तयार करताना 306 पुरूषांच्या हत्यांच्या घटनांचा अभ्यास करण्यात आला. यातील 213 प्रकरणांमध्ये पत्नी आणि तिच्या प्रियकरांनी पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांना आक्षेप घेतल्यामुळे पतीची हत्या करण्यात आल्याचेही या अहवालात समोर आले आहे. त्याच बरोबर जोडप्यांमधील आर्थिक कारणावरून वाद,घरगुती भांडणे आणि संशय यावरूनही पत्नीनं प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. एकम न्याय फाऊंडेशनने अनेक भीषण घटनांचे पुरावे गोळा केले आहेत. ज्यामध्ये पतींचे तुकडे केले गेले, विषप्रयोग केला गेला, वार केले गेले, गळा दाबला आणि इतर लोकांकडून मारहाण करण्यात आली. अशा अनेक प्रकरणांमध्ये पत्नी पुराव्या अभावी अनेक वेळा पकडली गेली नाही. शिवाय पतींच्या हत्याबाबत पोलिसांची दिशाभूल ही करण्यात आली. हत्येची घटना आत्महत्या म्हणून दाखवण्यात आल्याचे प्रकार ही यात घडले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये पीडितांचे कमाल वय 75 वर्षे आणि किमान 18 वर्षे आहे.
517 प्रकरणात पतीच्या आत्महत्याच्या घटनांचा अभ्यास केला गेला. त्यातील 235 आत्महत्या मानसिक क्रूरतेमुळे झाल्या आहेत. 47 आत्महत्या व्यभिचारामुळे, तर 45 आत्महत्या खोट्या आरोपांमुळे झाल्याचे या अहवालाच्या माध्यमातून समोर आल्या आहेत. 22 आत्महत्या घरगुती हिंसाचारामुळे झाल्या आहेत. 168 आत्महत्या संशय, सोडून देणे, फसवणूक किंवा आर्थिक वादामुळे झाल्या आहेत ही बाब स्पष्ट झाली आहे. मानसिक क्रूरता, खोटे आरोप, पत्नीचे विवाहबाह्य संबंध आणि कौटुंबिक हिंसाचार ही प्रमुख कारणे पुरुषांच्या आत्महत्यामागे आहेत.
पुरूषांच्या हत्या ?
306 पुरूषांच्या हत्यांच्या घटनांचा अभ्यास केला गेला
213 प्रकरणांमध्ये पत्नी आणि त्यांच्या प्रियकरांनी पतीची हत्या केली.
हत्येची कारणं..
पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांना आक्षेप घेतल्यामुळे पतीची हत्या करण्यात आली
जोडप्यांमधील आर्थिक कारणावरून वाद
घरगुती भांडणे आणि संशय यावरूनही पत्नीनं प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याच्या घटना उघड
NCRB अहवाल काय सांगतो ?
ताजा NCRB चा अहवाल पाहिला तर 2022 मध्ये 1,22,724 पुरुषांनी आत्महत्या केल्या आहेत. तर 48,172 महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. 2022 मध्ये आत्महत्या केलेल्या विवाहित पुरुषांची संख्या 82,000 होती. कौटुंबिक समस्यांमुळे 38,904 पुरूषांनी आत्महत्या केल्या आहेत. वैवाहिक समस्यांमुळे 5,891 पुरुषांनी आत्महत्या केल्या आहेत. पुरुषांच्या आत्महत्येचे सर्वात सामान्य कारण म्हणजे कौटुंबिक समस्या असल्याचेही समोर आले आहे. महिला गुन्हेगाराकडे समाज, सरकारचे दुर्लक्ष असल्याचं या अहवालात म्हटले आहे. महिलांच्या गुन्ह्याकडे समाज, सरकार, प्रसार माध्यमे दुर्लक्ष करत आहेत. महिलांकडून होणाऱ्या गुन्ह्यांकडे कधीही लक्ष दिले गेले नाही. याबद्दल कधी बोलणे ही गरजेचे मानले गेले नाही.
त्यामुळे समाजात केवळ पुरुषच हिंसक असल्याचा समज निर्माण झाला आहे.
पुरूषांच्या आत्महत्या
517 प्रकरणात पतीच्या आत्महत्याच्या घटनांचा अभ्यास केला.
235 आत्महत्या मानसिक क्रूरतेमुळे झाल्या.
47 आत्महत्या व्यभिचारामुळे
45 आत्महत्या खोट्या आरोपांमुळे
22 आत्महत्या घरगुती हिंसाचारामुळे झाल्या आहेत.
168 आत्महत्या संशय, सोडून देणे, फसवणूक किंवा आर्थिक वादामुळे झाल्या आहेत.
मानसिक क्रूरता, खोटे आरोप, पत्नीचे विवाहबाह्य संबंध आणि कौटुंबिक हिंसाचार ही प्रमुख कारणे पुरुषांच्या आत्महत्यामागे आहेत.
पुरूष आयोग स्थापन करा - दिपीका भारद्वाज
एकम न्याय फाऊंडेशनच्या संस्थापक दीपिका नारायण भारद्वाज यांनी सांगितलं की एकम न्याय फाऊंडेशनच्या माध्यमातून आमचा प्रयत्न समाजातील कायदेशीर आणि सामाजिक अवहेलनामुळे पुरुष आणि त्यांच्या कुटुंबियांना होणाऱ्या त्रास आणि समस्यांवर प्रकाश टाकण्याचा आहे. पीडित पुरुषांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत न्याय द्यायला पाहीजे. लिंग तटस्थतेच्या आधारे कायदे करण्याची गरज ही आहे. पत्नींकडून होणारा व्यभिचार आणि महिला जोडीदारांकडून होणारी हिंसा यांचा कोणत्याही पुरुषावर गंभीर परिणाम होऊ शकतो. पुरुष त्याचे मूक बळी आहेत. असंही त्या म्हणाल्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world