जाहिरात

'आमच्या केंद्रीय मंत्र्यांनी विरोधकांना मदत केली', शिंदेंच्या आमदारांचा गंभीर आरोप

बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील विजयी झालेले शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केंद्रीय प्रतापराव जाधव (Parataprao Jadhav) यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. 

'आमच्या केंद्रीय मंत्र्यांनी विरोधकांना मदत केली', शिंदेंच्या आमदारांचा गंभीर आरोप
Sanjay Gaikwad
मुंबई:

अमोल गावंडे, प्रतिनिधी

राज्यात 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं आहे. भाजपाला 132, शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्य़ा पक्षाला 57 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 51 जागा मिळाल्या आहेत. निवडणूक निकालावरुन अंतर्गत मतभेद बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे नागपुरातील पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना लक्ष्य केलं. त्याचवेळी बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील विजयी झालेले शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केंद्रीय प्रतापराव जाधव (Parataprao Jadhav) यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय केला आरोप?

संजय गायकवाड यांना या निवडणुकीत बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून 841 मतांनी निसटता विजय मिळला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार जयश्री शेळके यांनी गायकवाड यांना कडवी लढत दिली. शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत गायकवाड यांची आमदारकी वाचली.

निवडून आल्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना गायकवाड यांना त्यांचा राग लपवता आला नाही. त्यांनी यावेळी बुलडाणाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावरच आरोप केला. 'एकाही पक्षाचा नेता माझ्यासोबत नव्हता. भाजपाचे अनेक नेते सोबत नव्हते. आमचे केंद्रीय मंत्री आमच्यासोबत नव्हते. संजय कुटे आणि आमच्या केंद्रीय मंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं तिकीटसुद्धा फायनल केलं,' असा आरोप गायकवाड यांनी यावेळी बोलताना केला. त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

EVM तर फक्त बहाणा, काँग्रेसला निवडणूक निकालापूर्वीच लागली होती पराभवाची चाहूल, सत्य उघड

( नक्की वाचा :  EVM तर फक्त बहाणा, काँग्रेसला निवडणूक निकालापूर्वीच लागली होती पराभवाची चाहूल, सत्य उघड )

संजय गायकवाड हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी पक्षाच्याच केंद्रीय मंत्र्यावर आरोप केल्यानं खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी गायकवाड हे वादग्रस्त वक्तव्यासाठी चर्चेत आले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जीभ चाटणाऱ्यांना 11 लाखांचं बक्षीस त्यांनी जाहीर केलं होतं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com