राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत विरोधी पक्षातील महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. या पराभवानंतर विरोधकांकडून EVM बाबत संशय व्यक्त करण्यात येत होता. विरोधकांकडून EVM बाबत शंका उपस्थित केली जात असतानाच निवडणूक आयोगानं नवी आकडेवारी जाहीर केली आहे. आयोगाच्या या आकडेवारीनं विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.
राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तानं विधानसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारच्या गडबडीची शक्यता फेटाळली आहे. आयोगानं याबाबत पत्रक प्रसिद्ध केलंय. त्यानुसार, ईव्हीएम आणि VVPAT स्लीपमध्ये कोणताही फरक आढळलेला नाही. विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांकडून सातत्यानं EVM मध्ये गडबड झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मारकटवाडीमध्ये तर बॅलेट पेपरवर पुन्हा एकदा मतदान घेण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
निवडणूक आयोगानं मंगळवारी (10 डिसेंबर) रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली तेव्हा राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रावरील VVPAT स्लीपची मोजणी केली. यामध्ये कोणतीही तफावत नव्हती. निकालाच्या दिवशी 288 विधानसभा मतदारसंघातील 1,440 VVPAT युनिटमधील स्लीपची मोजणी करण्यात आली. त्यामध्ये कोणताही फरक आढळला नाही.
( नक्की वाचा : शरद पवारांनी लेकीचा आणि नातवाचा राजीनामा घ्यावा, मारकडवाडीमध्ये गोपीचंद पडाळकरांचं थेट चॅलेंज )
23 नोव्हेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशानुसार, प्रत्येक मतदारसंघातील पाच मतदान केंद्रावरील VVPAT स्लीपची मोजणी आवश्यक आहे. निवडणूक आयोगानं 23 नोव्हेंबर रोजी निरीक्षक आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर 288 मतदारसंघातील 1440 VVPT स्लीपची मोजणी केली. त्याची आकडेवारी कंट्रोल युनिटशी जुळणारी आहे, असं आयोगानं स्पष्ट केलं.
During the Maharashtra assembly elections 2024 as per Supreme Court of India and Election Commission of India guidelines, 5 VVPAT machines at each assembly constituency were to be counted, to match it with the numbers in EVM. In all 288 assembly constituencies, a total number of… pic.twitter.com/DDsi80C1Ph
— ANI (@ANI) December 10, 2024
यापूर्वी निवडणूक आयोगावर टीका करणारी प्रवृत्ती वाढत असल्याचं मत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी एनडीटीव्हीच्या कार्यक्रमात व्यक्त केलं होतं. सकारात्मका पाहण्याची तसंच प्रशंसा करण्याची वृत्ती कमी होत असल्याचं निरीक्षण मुख्य निवडणूक आयुक्तांनी व्यक्त केलं होतं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निवडणूक EVM चा वापर करण्यास विरोध केला होता. तर बॅलेट पेपरच्या मदतीनं पुन्हा मतदान घेण्याचा सल्ला दिला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world