जाहिरात

Kalyan News : OTP घेताच तो निघून गेला; कल्याणच्या रस्त्यावर दीड तास लहानग्या बहिणीसाठी मोठीची धावाधाव

ओला चालकाच्या एका चुकीमुळे कल्याणमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

Kalyan News :  OTP घेताच तो निघून गेला; कल्याणच्या रस्त्यावर दीड तास लहानग्या बहिणीसाठी मोठीची धावाधाव

Kalyan News : ओला चालकाच्या एका चुकीमुळे कल्याणमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. तब्बल दीड तास एक मोठी बहीण आपल्या लहान बहिणीसाठी ओक्साबोक्शी रडत होती. काही वेळाने पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला. कल्याणमध्ये नेमकं काय घडलं?

ओला चालकाची एक चूक अन् मोठ्या बहिणीच्या अश्रूचा बांध फुटला...

ओला चालकाला ओटीपी दिला. कार रवाना झाली. त्या गाडीत ११ वर्षाची मुलगी असल्याने ओला चालक फोन न उचलल्याने जवळपास गोंधळाची परिस्थिती उद्धवली होती अखेर कल्याणच्या महात्मा  फुले पोलिसांनी त्वरीत कारवाई करीत हा सगळा संभ्रम संपविला. आप्लया लहान बहिणाला सुखरुप येताना पाहून तिच्या बहिणीच्या डोळ्यात आनंद आश्रू तरळले.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन सख्या बहिणी आईला भेटण्यासाठी ठाण्याला निघाल्या होत्या. यासाठी त्यांनी दोन ओला कार बुक केली. यातील एक ओला कार आली. मोठ्या बहिणीने त्यात काही वस्तू आणि ११ वर्षांच्या बहिणीला बसवलं अन् ओला चालकाला ओटीपी नंबर दिला. त्यादरम्यान दुसरी ओला कार आली. त्या कारमध्ये सामान टाकलं. याच वेळी काहीही न सांगता पहिली ओला कार निघून गेली. यानंतर महिला घाबरली. ओला कारमध्ये तिची लहान बहीण एकटी होती. ओला चालक कुणाचे फोनही उलचत नव्हता, त्यामुळे महिला अधिक धास्तावली. महिला भर चौकात ढसाढसा रडू लागली. तिने ११२ हेल्पलाईनवर कॉल केला. महात्मा फुले पोलीस बेतूरकर पाडा चौकात हजर झाले. वरिष्ठ पोलीस निरिक्षक बालकृष्ण परदेशी यांनी चौकशी सुरू केली. कार चालक पोलिसाचा देखील फोन उचलत नव्हता. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला.

नक्की वाचा - Mumbai News : मुंबईतील 'या' भागात दहशतीचं वातावरण; व्यापाऱ्यांकडून दुकानं बंद ठेवण्याचा इशारा

काहीवेळाने कार चालकाचा फोन आला. मी कळव्यापर्यंत पोहचल्याचं त्याने सांगितलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक परदेशी यांनी लहान मुलीची चौकशी केली. कार चालकाने मुलगी सोबत असल्याचं सांगितले. पोलिसांनी त्वरीत ओला चालकाला गाडी पुन्हा मागे फिरवण्यास सांगितली. जवळपास एका तासानंतर ती कार परत आली. कार येताच त्या कारमध्ये आपली लहान बहीण आस्था वर्माला पाहून मोठी बहीण उज्ज्वला माणिक हिच्या डोळ्यात  आनंदाश्रू आले. तिच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. हा सर्व गोंधळ कार चालकाने फोन न उचलल्याने झाल्याचं समोर येत आहे. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com