
अमजद खान, प्रतिनिधी
Badlapur Muncipal Election Latest News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार असून अनेक ठिकाणी आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळीही येत्या काही दिवसांमध्ये सुरु होणार आहे. तत्पूर्वी, बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी मोठं विधान केलं आहे. बदलापूर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मतदार यादीत शहराबाहेरील 17 हजार मतदारांची नावं आहेत. हे मतदार मतदान करायला आले तर त्यांना चोप देऊ,असा इशारा वामन म्हात्रे यांनी दिला आहे.
शिंदे गटाचे नेते वामन म्हात्रेंनी बाहेरच्या मतदारांना दिला इशारा
माध्यमांशी बोलताना वामन म्हात्रे म्हणाले, निवडणुका जाहीर होताना मतदार यादीचं काम चालू आहे. कर्जत, चिखलोली,भिवंडी, शहापूर विभाग असेल, या ठिकाणचे बरेचसे काही उमेदवार आहेत,त्या लोकांनी त्यांची नावे आपल्या प्रभागात खोटे पेपर तयार करून नोंदवली आहेत. 17 हजार नावे या बदलापूर शहरात विविध भागांतून नोंदवली आहेत. हा खरा देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे.अशी निवडणूक आयोगाकडे आम्ही मागणी केली आहे. हेंद्रपाडा, कात्रप, गावदेवी, खरवई असेल या ठिकाणी त्या त्या नातेवाईकांची नावे नोंदवली आहेत. जर मतदारांनी बाहेरुन येऊन मतदान करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांना त्या बुधवर उत्तर देणार आहोत. प्रत्येकाचा पत्ता, फोटो आमच्याकडे आहे. आम्ही नक्कीच त्याला चोप दिल्याशिवाय राहणार नाही.
नक्की वाचा >> पुणे हादरलं! महिलेला बाईकवर लिफ्ट दिली..नंतर झुडपात नेऊन अत्याचार केला, पोलिसांनी 100 हून अधिक CCTV तपासले अन्
बदलापूरमध्ये प्रत्येक प्रभागात एकाच नावाच्या अनेक मतदारांची नोंदणी करण्यात आली असून दुबार मतदारांची संख्या मोठी आहे.तर बदलापूर शहरालगतच्या ग्रामीण भागातील तब्बल 17 हजार मतदारांची नावं बदलापूर शहराच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. खोटी कागदपत्रे देऊन या मतदारांची नावं बदलापूर शहराच्या यादीत टाकण्यात आली असून याबाबत निवडणूक आयोगाला तक्रार करण्यात आलीय. या सर्व मतदारांसह त्यांची नावं टाकणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी केलीय.
'त्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा'
यामध्ये मलंगगड,बारवी परिसर,मुरबाड,शेलू,नेरळ,वांगणी, भिवंडी,शहापूर,कर्जत आणि आसपासच्या ग्रामीण भागातल्या मतदारांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहितीही म्हात्रे यांनी दिलीय.तसंच हे मतदार जर मतदानाच्या दिवशी बोगस मतदान करायला आले,तर त्यांना चोप देऊ असा इशारा शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिला आहे.मतदानाच्या दिवशी जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला,तर त्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असेल,असंही वामन म्हात्रे म्हणाले आहेत.
नक्की वाचा >>आधी केस मोकळे सोडले अन् नंतर झिंज्या उडवल्या, या हँडसमसोबत श्वेता तिवारी थिरकली, दिवाळी पर्टीचा Video व्हायरल
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world