Nashik News : बोगस तृतीयपंथीय पंचवटीच्या फुल बाजारात घुसला, महिलांकडे केली 'ती' मागणी, लोकांनी धू-धू धुतला

नाशिकच्या पंचवटी परिसरातील फुल बाजारात एक धक्कादायक घटना घडली.फुल विक्रेत्यांकडून जबरदस्तीने पैसे मागणाऱ्या या बोगस तृतीयपंथीयाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Nashik Fake Transgender Crime News

राहुल वाघ, प्रतिनिधी 

Nashik Crime News Today : नाशिकच्या पंचवटी परिसरातील फुल बाजारात एक धक्कादायक घटना घडली.फुल विक्रेत्यांकडून जबरदस्तीने पैसे मागणाऱ्या या बोगस तृतीयपंथीयाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे. हा तृतीयपंथीय पंचवटीच्या फुल बाजारात फिरून महिलांना आणि इतर लोकांना धमकंवायचा आणि त्यांच्याकडे पैशांची मागणी करायचा,अशी माहिती समोर आली आहे. संबंधित व्यक्ती अनेक दिवसांपासून फुल विक्रेत्यांना त्रास देत होता आणि जबरदस्तीने पैसे उकळायचा,अशी तक्रार करण्यात आली होती. यामुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्याला जाब विचारला.त्यानंतर वाद इतका वाढला की,नागरिकांनी त्याला मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार पंचवटीतील गजबजलेल्या फुल बाजारात घडला असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

खरा तृतीयपंथीय येताच पर्दाफाश झाला

 "सकाळी फूलबाजारात पाच वाजेपासून सात वाजेपर्यंत पन्नास-शंभर रुपये मागत होता.बायांकडे पैसे मागत होता. मला फोन आले. मी झोपेत असल्यामुळे फोन उचलू शकलो नाही. मला लोक घरी बोलवायला आले.मी आल्यानंतर याला पकडलंय आणि मारलंय. उद्या उठून नाशिकमध्ये कुठेही फिरेल,तेव्हा बाजारपेठ वाल्यांनी सावधान राहावं. आल्यानंतर असे बहिरूपी उभेच करू नका.डायरेक्ट पोलीस स्टेशनला फोन करा.आता इथून पुढे तो कुठे बाहेर जाईल आणि नाशिकच्या किन्नरांच्या हाती लागेल.त्याचा मोबाईल जप्त केलेला आहे. फोन चेक करून त्याच्या गुरूला फोन करू",अशी प्रतिक्रिया एका तृतीयपंथीयाने दिली आहे.

नक्की वाचा >> सीक्रेट चॅटिंग करणाऱ्यांची मज्जा,मेसेज वाचल्यावर कायमचा होणार गायब, WhatsApp चं नवं फिचर चक्रावून टाकणारं

या घटनेमुळं कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न

दरम्यान, नाशिकमध्ये भर बाजारात बोसग तृतीयपंथीयाने अर्धनग्न होऊन धिंगाणा घातल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळं कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.बोगस तृतीयपंथीयाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं समजते. बाजारात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये आणि कायदा सुव्यवस्था खराब होऊ नये, यासाठी पोलिसांनी या घटनेची दखल घेत संबंधीत व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. 

Advertisement

नक्की वाचा >>Dombivli News: डोंबिवलीतील कुख्यात बिल्डर प्रफुल गोरेचा आणखी एक काळा कारनामा उघड, ग्राहकाची पोलिसांत धाव