महाराष्ट्रात घडली 'क्राईम सिनेमा'सारखी घटना; पोलिसांचाही अंदाज चुकला, भलतेच घडले

तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी पांडुरंगच्या खुनामागचे नेमके कारण काय असावे याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल डेटाचा वापर करून अधिक माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला

Advertisement
Read Time: 3 mins
सांगली:

शरद सातपुते

सांगली जिल्ह्यात बरीच धक्कादायक वळणे असलेल्या चित्रपटात शोभेल अशी घटना घडली आहे. 44 वर्षांच्या एका व्यक्तीचा इस्लामपूरमध्ये खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा शोध घेणाऱ्या पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. यातील मुख्य आरोपीचे नाव सुरेश नारायण ताटे(45 वर्षे) आहे. सुरेश हा इस्लामपूरचाच रहिवासी आहे. सुरेशचे दोन साथीदार  विशाल जयवंत भोसले आणि शिवाजी भिमराव भुसाळे यांनाही अटक करण्यात आली आहे. यातील शिवाजी हा मूळचा कर्नाटकचा राहणारा आहे.  

Advertisement

(नक्की वाचा: Video: लाच घेतलेल्या पैशाचं वाटप करताना CCTV मध्ये सापडले पोलीस, पुढं काय घडलं?)

कासेगाव-वाटेगाव रस्त्यावर एका विहिरीच्या परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. पोलील घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी हा मृतदेह कोणाचा आहे, आणि त्याचा खून कोणी केला हे शोधण्यास सुरुवात केली. या व्यक्तीला गोळ्या घालण्यात आल्या होत्या असे मृतदेह पाहिल्यानंतर स्पष्टपणे दिसत होते. हा मृतदेह 44 वर्षांच्या पांडुरंग शिद याचा असल्याचे पोलिसांना कळाले. त्याची अधिक माहिती काढली असता पोलिसांना कळाले की पांडुरंग हा व्याजाने पैसे देण्याचे काम करत होता. व्याजाने दिलेल्या पैशातून त्याचा कोणासोबत वाद झाला असावा आणि या वादातूनच हा खून झाला असावा असा पोलिसांना संशय यायला लागला होता. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत सूचना दिल्या होत्या.

Advertisement

Advertisement

(नक्की वाचा: मित्रांनीच केले मैत्रिणींचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल, पुढे जे झालं ते...)

तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी पांडुरंगच्या खुनामागचे नेमके कारण काय असावे याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल डेटाचा वापर करून अधिक माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की एक माणूस गेल्या 4-5 महिन्यांपासून 'एका व्यक्तीला मारायचे आहे, त्यासाठी बंदूक मिळेल का?' अशी विचारणा करत होता. याच व्यक्तीने सुपारी घेऊन एकाचा खून करायचा आहे, कोणी ही सुपारी घेईल का? असा प्रश्नही विचारला होता. 

(नक्की वाचा: मुलाला Online Game चा नाद, कर्जबाजारी झालेल्या आई-वडिलांनी उचलले भयंकर पाऊल)

पोलिसांनी या व्यक्तीची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी या व्यक्तीला पकडले आणि त्याच्या चौकशीला सुरुवात केली. चौकशीदरम्यान त्या व्यक्तीने त्याचे नाव सुरेश ताटे असल्याचे सांगितले. पोलिसी खाक्या दाखवतायच सुरेशने सगळ्या गोष्टी सांगून टाकल्या. सुरेशने सांगितले की सुपारी घेऊन पांडुरंगची हत्या करणारे विशाल भोसले आणि शिवाजी भुसाळे हे दोघे त्याचे नातेवाईक आहेत. सुपारी घेऊन खून करण्यासाठी कोणी तयार नसल्याने या दोघांना सुरेशने सुपारी दिली होती. पांडुरंगचा खून करण्यासाठी सुरेशने 6 लाख रुपयांची सुपारी दिली होती. ही रक्कम ऐकून विशाल आणि शिवाजी खून करण्यास तयार होते, मात्र अडचण ही होती की त्यांना बंदूक चालवता येत नव्हती.

(नक्की वाचा:मोबाइल खरेदी करायला गेले अन् थेट चोरलाच; बड्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा धक्कादायक प्रकार)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल आणि शिवाजी यांनी सुपारी घेतली होती खरी मात्र गोळ्या कसा झाडायच्या हे त्यांना माहिती नव्हते. यावर त्यांनी एक तोडगा काढला होता. त्यांना सोशल मीडियावर व्हिडीओ पाहून बंदूक कशी चालवायची याचं प्रशिक्षण घेतलं होतं. पोलिसांना तपासादरम्यान ही हत्या का झाली याचं कारणही कळालं. पांडुरंगचे आणि आपल्या बायकोशी अनैतिक संबंध आहेत असा सुरेशला संशय होता. याच संशयातून त्याने पांडुरंगचा काटा काढण्याचं ठरवलं होतं. सुरेशने पांडुरंगच्या खुनासाठी बंदूक कुठून आणली याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. 

Topics mentioned in this article