जाहिरात

6 वर्षांचा संसार आणि 2 वर्षांची लेक; पुतण्याच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या आईने केलं सारं उद्ध्वस्त

Wife Killed Husband: लग्नामध्ये सर्वांच्या साक्षीनं ज्या पत्नीने आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या, तिनेच स्वत:च्या नवऱ्याचा अत्यंत क्रूरपणे काटा काढला.

6 वर्षांचा संसार आणि 2 वर्षांची लेक; पुतण्याच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या आईने केलं सारं उद्ध्वस्त
Wife Killed Husband: पवन ठाकूर यांचं 6 वर्षांपूर्वी आंचल नावाच्या तरुणीशी लग्न झालं होतं.
मुंबई:

Wife Killed Husband: लग्नामध्ये सर्वांच्या साक्षीनं ज्या पत्नीने आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या, तिनेच स्वत:च्या नवऱ्याचा अत्यंत क्रूरपणे काटा काढला. अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या नवऱ्याचे आधी करंट देऊन हाल-हाल केले आणि त्यानंतर विष देऊन त्याची हत्या करण्यात आली. या खळबळजनक हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली  आहे. येथील पवन ठाकूर यांचं 6 वर्षांपूर्वी आंचल नावाच्या तरुणीशी लग्न झालं होतं.  त्यांना २ वर्षांची एक लहान मुलगी देखील आहे. मात्र, आंचलचे तिच्याच नात्याने पुतण्या लागणाऱ्या अंकित नावाच्या तरुणाशी गेल्या 2 वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. 

काकू आणि पुतण्याच्या या अपवित्र नात्याची कुणकुण पवन यांना लागली, तेव्हा त्यांनी याला तीव्र विरोध केला. पवन यांनी पत्नीला वारंवार समजवण्याचा प्रयत्न केला, पण आंचलवर प्रेमाची इतकी धुंदी चढली होती की तिने नवऱ्याचाच कायमचा काटा काढण्याचे ठरवले.

( नक्की वाचा : 24 व्या वर्षी झाला IPS, पण एका चुकीने सगळंच संपलं! आता संपत्तीही जाणार; वाचा काय आहे प्रकरण? )
 

आधी करंटचे झटके, मग जबरदस्तीने पाजले विष

या हत्येच्या कटात आंचलने तिचा प्रियकर अंकित, तिची सगी बहीण शिखा आणि तिचा साथीदार अजय दिवाकर यांनाही सामील करून घेतले. ठरलेल्या योजनेनुसार, आंचलने पवन यांना घरी बोलावून घेतले. पवन घरात येताच या चौघांनी मिळून त्यांना पकडले आणि त्यांचे हातपाय बांधले. त्यानंतर पवन यांना विजेचे धोकादायक झटके देऊन त्यांचे हाल-हाल केले. इतक्या क्रूरतेनंतरही जेव्हा त्यांचा जीव गेला नाही, तेव्हा आरोपींनी जबरदस्तीने त्यांच्या तोंडात विषारी पदार्थ ओतला. करंट आणि विषाच्या दुहेरी मारामुळे पवन यांनी जागीच प्राण सोडले.

 बनाव अंगलट

पवन यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी हे प्रकरण आत्महत्येचे असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पवन यांचा भाऊ देवेंद्र आणि कुटुंबाला या मृत्यूवर संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. एसएसपी सत्यपाल अंतिल यांनी तात्काळ या प्रकरणाचा तपास सुरू करण्याचे आदेश दिले. शवविच्छेदन अहवालात पवन यांच्या शरीरावर मारहाणीच्या ९ गंभीर खुणा आढळल्या. तसेच त्यांचा मृत्यू विष आणि करंटमुळे झाल्याचे स्पष्ट होताच पत्नीचा बनाव उघड झाला.

( नक्की वाचा : 15 दिवसांत घर सोडण्याचे आदेश! आई-वडिलांना बेघर करणाऱ्या मुलाला जिल्हाधिकाऱ्यांनी शिकवला धडा )
 

हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त

अनधिकृत संबंधांच्या आणि लालसेच्या पायी आंचलने स्वतःचा संसार स्वतःच्या हाताने उध्वस्त केला. या घटनेमुळे 2 वर्षांच्या चिमुकलीच्या डोक्यावरचे पित्याचे छत्र हरवले आहे, तर जन्मदाती आई आता तुरुंगाच्या सलाखांआड गेली आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी पत्नी आंचल, तिचा प्रियकर अंकित, बहीण शिखा आणि अजय दिवाकर या चौघांनाही अटक केली असून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com