जाहिरात

काळं तेल, तंबाखूच्या पुड्या; संभाजीनगरमधील इमरतीसाठी प्रसिद्ध उपहारगृहाला मुंढे यांचा दणका; परवाना निलंबित

संभाजीनगरमधील एका प्रसिद्ध हॉटेलमधील धक्कादायक फोटो समोर आले आहेत. या उपहारगृहाच्या स्वयंपाकघरात स्वच्छतेचे धिंडवले उडाल्याचं दिसून आल्याचं चित्र पाहायला मिळालं. 

काळं तेल, तंबाखूच्या पुड्या; संभाजीनगरमधील इमरतीसाठी प्रसिद्ध उपहारगृहाला मुंढे यांचा दणका; परवाना निलंबित

Sambhajinagar News : अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची वर्णी लागल्यापासून विविध आस्थापनांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एफडीएने मोठी कारवाई केली आहे. संभाजीनगरमधील एका प्रसिद्ध हॉटेलमधील धक्कादायक फोटो समोर आले आहेत. या उपहारगृहाच्या स्वयंपाकघरात स्वच्छतेचे धिंडवले उडाल्याचं दिसून आल्याचं चित्र पाहायला मिळालं. 

इमारतीसाठी प्रसिद्ध असलेल्या उपहारगृहाचा परवाना निलंबित...

छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेलचं नाव उत्तम उपहारगृह आहे. या उपहारगृहातील इमरती ग्राहकांमध्ये प्रसिद्ध आहे. लोक लांबून येथे इमरती खाण्यासाठी येत असल्याचं सांगितलं जातं. या उपहारगृहाचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मात्र प्रत्यक्षात या उपहारगृहाच्या स्वयंपाकघरात धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. 

तेलाचा वारंवार वापर...

भजी आणि सामोरे तळण्यासाठी तेच ते तेल पुन्हा वापरले जात होते. या तेलाची टीपीसी तपासणी केली असता तेलाचे बीआर रीडिंग तब्बल ५८ आढळले, जे आरोग्यासाठी घातक मानलं जातं. तर दुसरीकडे इमरती आणि जिलबीसाठी वापरल्या जाणाऱ्या डालडा किंवा वनस्पती तुपाचे बीआर रीडिंग ३६ नोंदवले गेले आहे. अन्न तयार करण्याच्या ठिकाणी झुरळांचा वावर होता, याशिवाय पेस्ट कंट्रोल केल्याची कोणतीही अधिकृत माहिती नव्हती. अन्न पदार्थ तयार केलं जात होतं त्या ठिकाणी पदार्थ ठेवलेल्या बरण्या अत्यंत अस्वच्छ होत्या. त्याशेजारी तंबाखूच्या पुड्या आढळून आल्या. अस्वच्छ ठिकाणी इडलीचं पिठ आंबवायला ठेवलं होतं. 

नक्की वाचा - मोबाइलच्या बॅटरीशी खेळ ठरला जीवघेणा; 15 वर्षांच्या लोकेशचा आक्रोश, चेहरा रक्तबंबाळ, ओळखता येईना...जागीच मृत्यू

उपहारगृहाच्या तपासणीदरम्यान गंभीर स्वरुपाच्या अनियमितता आढळून आल्याचं FDA च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या उपहारगृहाने परवाना चुकीच्या Kind of Business (Restaurant) अंतर्गत घेतला असल्याचं निदर्शनास आले. त्याशिवाय इमरती, जिलेबी आणि इतर मिठाईमध्ये Synthetic Food Colour Tartrazine चा वापर केला जात असल्याचं आढळलं. वापरण्यात येणाऱ्या कृत्रिम रंगाचे प्रमाण नोंदविण्यासाठी आवश्यक मोजमापाची कोणतीही नोंद उपलब्ध नव्हती. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com