Pune Video : 'हॉर्न का वाजवला?' पुण्यात भररस्त्यात तुफान राडा; कपडे काढून चालकाला धू धू धुतलं

एका क्षुल्लक कारणावरुन पुण्यातील भवानी पेठ परिसरात मोठा राडा झाल्याची माहिती आहे

जाहिरात
Read Time: 1 min

Pune Crime Video : पुण्यात कधी काय होईल, ते सांगता येत नाही. पुण्यातून मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अक्षरश: कपडे काढून एका माणसाने समोरच्याला बेदम मारलं. काहीवेळाने या मारहाणीत आणखी लोक सामील झाले आणि पुण्यात भररस्त्यात राडा झाला. एका क्षुल्लक कारणावरुन दोन गटात तुफान मारहाण झाल्याचं पाहायला मिळालं.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, गाडीचं हॉर्न वाजवण्यावरून पुण्यात दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली. रस्त्यावरून जात असताना गाडीचा हॉर्न वाजवला म्हणून या मंडळींनी एकमेकांना जबर मारहाण केली. पुण्यातील भवानी पेठेतून ही घटना समोर आली आहे. या प्रकरणात पुण्यातील खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नक्की वाचा - Pangolins Smuggling : खवल्या मांजरांची मराठवाडा-विदर्भातून थेट चीन, व्हिएतनाममध्ये तस्करी; का असते इतकी मागणी? 

 

प्राथमिक चौकशीनुसार, रस्ता क्रॉस करत असताना दुचाकीस्वाराने हॉर्न वाजवल्याच्या कारणाने ही मारहाण झाली आहे. या प्रकरणात खडक पोलिसांकडून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.