जाहिरात

Pangolins Smuggling : खवल्या मांजरांची मराठवाडा-विदर्भातून थेट चीन, व्हिएतनाममध्ये तस्करी; का असते इतकी मागणी? 

मागील चार वर्षात राज्यात 137 खवल्या मांजरांची तस्करी झाल्याचे वन विभागाच्या अहवालात नमूद असल्याचं समोर आलं आहे.

Pangolins Smuggling : खवल्या मांजरांची मराठवाडा-विदर्भातून थेट चीन, व्हिएतनाममध्ये तस्करी; का असते इतकी मागणी? 

Pangolins Smuggling : जालन्यात वन विभागाने मार्च महिन्यात खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या 6 जणांना सापळा रचून अटक केली होती. या प्रकरणातील 3 आरोपी मात्र फरार झाले होते. दुर्मीळ खवल्या मांजरांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात तस्करी केल्या जातं असल्याची धक्कादायक बाब वन विभागच्या चौकशीतून समोर आली आहे.

हे तस्कर चिनी, व्हिएतनाम या देशात औषधांसाठी खवल्यांना मोठी मागणी असल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शिकाऱ्याकडून चाळीस हजारात मांजर घेत गुजरात, ओडिशा राज्यातील दलालांमार्फत पश्चिम बंगाल, सिक्कीममार्गे चीन, म्यानमार, व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशिया या देशात खवल्या मांजरांच्या अवशेष 30 लाखांपर्यंत विक्री करायचे अशी माहिती ही वन विभागाच्या तपासात समोर आली आहे. त्यामुळे वन विभागानं आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या टीम तयार करून शोध सुरुवात केलीय.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मार्च महिन्यात केलेल्या कारवाईनंतर वन विभागाच्या पथकानं वाशीम जिल्ह्यातील मानोरा येथील संशयीत आयुब खान मिरादद खान याच्या घराजवळ खोदलेल्या खड्डयातून पुरलेले मृत खवल्या मांजराचे अवशेष ही जप्त केले होते. तो या मांजराचे खवले आणि हाडं तस्कऱ्यांना विकणार होता, अशी माहिती ही समोर आली आहे. 

Kashmir Zipline Video : 7 मिनिटांच्या अंतराने वाचलो, हल्ल्यावेळी झिपलाइन व्हिडिओ करणाऱ्या ऋषि भट्टचा धक्कादायक अनुभव

नक्की वाचा - Kashmir Zipline Video : 7 मिनिटांच्या अंतराने वाचलो, हल्ल्यावेळी झिपलाइन व्हिडिओ करणाऱ्या ऋषि भट्टचा धक्कादायक अनुभव

मागील चार वर्षात राज्यात 137 खवल्या मांजरांची तस्करी झाल्याचे वन विभागाच्या अहवालात नमूद असल्याचं समोर आलं आहे. तर 19 फेब्रुवारी 2024 मध्ये नाशिकच्या जुन्नर भागात सात तस्करांना 19 फेब्रुवारी 2025 वर्ध्यात खवल्या मांजरांची तस्करी करणारी टोळी ताब्यात घेण्यात आली होती.  तर 8 मार्च 2025 ला विदर्भातून जिवंत खवले मांजर विक्री करताना सात जणांना अटक झाली. दरम्यान जालन्यात एक जिवंत व एक मृत खवले मांजर, कातडी, नखे, हाडे, मांस पकडत 6 आरोपींना अटक करण्यात आली. तर यातील 3 जण फरार झाले होते.

खवल्या मांजरांची का असते इतकी मागणी?

खवले मांजर हा जगातील सर्वात जास्त तस्करी केला जाणार सस्तन प्राणी आहे. जगात खवले मांजराच्या आठ प्रजाती आढळतात. त्यातील चार प्रजाती आफ्रिकेत, तर चार आशिया खंडात आढळून येतात. त्यातील दोन प्रजाती या भारतात मराठावाडा आणि विदर्भात सापडतात. खवल्या मांजरचे मांस हे प्रथिनांनी समृद्ध असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या मांसाला लाखोंची किमती असते. त्याशिवाय काळी जादू, जादूटोणा यासाठीही खवल्या मांजरांचा वापर केला जातो. त्यामुळे या मांजरांची शिकार करून तस्करी केली जाते. 

या तस्कऱ्यांवर कारवाई केल्यानंतर ते दुसऱ्या जिल्ह्यात हलतात. सध्या वनविभागाकडून अटकेतील आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. आरोपी आणखी कोणाच्या संपर्कात होते, आणखी कोणत्या राज्यात ही तस्करी केली जात याचाही तपास सुरू आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: