जाहिरात

Jalgaon News : दक्षता पेट्रोल पंपावर 1 कोटी 33 लाखांचा अपहार; पोलीस उपनिरीक्षकाच्या कृत्यामुळे पंपाला टाळं

जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या दक्षता पेट्रोल पंपावर कोट्यावधी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Jalgaon News : दक्षता पेट्रोल पंपावर 1 कोटी 33 लाखांचा अपहार; पोलीस उपनिरीक्षकाच्या कृत्यामुळे पंपाला टाळं

मंगेश जोशी, प्रतिनिधी

Jalgaon News : जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या दक्षता पेट्रोल पंपावर कोट्यावधी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून नियुक्त केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाकडूनच कोट्यवधी रुपयाचा आर्थिक अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 1 कोटी 33 लाख 752 रुपयांच्या अपहार प्रकरणी उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ विरुद्ध जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहाराच्या प्रकारामुळे तूर्तास दक्षता पेट्रोल पंप पोलिसांवर बंद करण्याची वेळ आली आहे. 

तब्बल १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा आर्थिक अपहार

जळगावात जिल्हा पोलीस दलाच्या मालकीच्या दक्षता पेट्रोल पंपावर तब्बल १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक असलेले पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नक्की वाचा - Pune News : डोळ्यात लाल तिखट फेकलं, भरबाजारात आई-भावासमोर मुलीला पळवलं; स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण

या तपासात वाल्मीक वाघ यांनी पंपाच्या व्यवहारातून अपहार करून ती रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे समोर आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक संदीप उत्तमराव पाटील यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, संबंधित पोलीस उपनिरीक्षक गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता असून त्याबाबत स्वतंत्र बेपत्ता नोंदही करण्यात आली आहे. अपहार उघड झाल्यानंतर कारवाईच्या भीतीपोटी चिठ्ठी लिहून ते फरार झाल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, दक्षता पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ जिल्हा पोलिसांवर आली आहे. 

दक्षता पेट्रोल पंप काय आहे?

विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस दलामार्फत दक्षता पेट्रोल पंप चालवला जातो. येथील कर्मचाऱ्यांची नियुक्ती पोलीस दलामार्फत केली जाते. सर्वसामान्यांसोबत पेट्रोल भरताना कोणतीही फसवणूक होऊ नये हा यामागील उद्देश असतो. याशिवाय या पेट्रोल पंपातून मिळणारं उत्पन्न पोलीस दलाला मिळतं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com