जाहिरात
This Article is From May 28, 2024

बनावट कागदपत्रे बनवली, नोकरीही मिळवली; पोलिसांकडून 5 बांगलादेशींना अटक

भोसरीच्या शांतीनगर येथे भारतीय नागरिक असल्याचे भासवून हे सर्वजण राहत होते. शांतीनगर येथील ओम क्रिएटिव्ह टेलर्स या कंपनीत ते काम करत होते.

बनावट कागदपत्रे  बनवली, नोकरीही मिळवली; पोलिसांकडून 5 बांगलादेशींना अटक

सूरज कसबे, पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये पाच बांगलादेशी नागरिकांना पोलिसांना अटक केली आहे. बनावट कागदपत्रांसह बेकायदा पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरात हे बांगलादेशी नागरिक राहत होते. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशत विरोधी शाखेनं ही कारवाई केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांकडून बनावट आधार कार्ड, जन्माचे दाखले, शाळा सोडल्याचे दाखले आणि पासपोर्ट  जप्त करण्यात आले आहे. शामीम नुरोल राणा, राज उर्फ सम्राट सदन अधिकारी, जलील नुरू शेख उर्फ जलील नूर मोहम्मद गोलदार, वसीम अजीज उलहक मंडल उर्फ वसीम अजीजऊल हक हिरा आणि आझाद शमशुल शेख उर्फ मोहंमद अबुल कलाम शमशुद्दिन फकीर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

(वाचा - गर्भपातादरम्यान मृत्यू, कारमधून महिलेचा मृतदेह शहरभर फिरवला; भयंकर प्रकार पाहून पोलिसही हादरले!)

या सर्वांना बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या अन्य दोघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशत विरोधी पथकाचे पोलीस शिपाई सुयोग लांडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हे बांगलादेशी नागरिक असून त्यांच्याकडे कोणताही परवाना नसताना ते याठिकाणी राहत होते. ते दोन्ही देशांच्या सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने आले होते. 

(वाचा - प्रेयसी बरोबर बोलतोय पाहून प्रियकराचा संताप, थेट चारचाकी अंगावर घातली)

भोसरीच्या शांतीनगर येथे भारतीय नागरिक असल्याचे भासवून हे सर्वजण राहत होते. शांतीनगर येथील ओम क्रिएटिव्ह टेलर्स या कंपनीत ते काम करत होते. याबाबत दहशतवादी विरोधी शाखेला माहिती मिळाल्यांनतर त्यांनी छापा टाकून या पाचही बांगलादेशी नागरिकांना अटक केली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: