पुणे आणि सांगलीमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सांगली तासगाव मार्गावर कोल्हापूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या प्रवासी जीपने दुचाकीवरिल चौघांना जोरदार धडक दिली. या अपघातात एका महिलेसह दोन बालकांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे.दुसरा अपघात पुण्यात झाला. पुणे सोलापूर महामार्गावर हा अपघात पहाटेच्या सुमारास झाला असून त्यात दोन जणांना आपल्या जीव गमवावा लागला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सांगली तासगाव मार्गावर कोल्हापूरच्या दिशेने एक प्रवासी जीप भरधाव वेगाने जात होती. त्यावेळी त्या समोर एक दुचाकी होती. दुचाकीवर चौघे जण होते. त्यात एक महिला, दोन लहान मुलं आणि त्या महिलेचा पती होता. गाडी कवलापूर कुमठे रोडवरली एस आर पेट्रोल पंपा समोर असताना जीपने या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की तीघांचा जागीच मृत्यू झाला. त्यात एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश होता. तर त्या महिलेचा पती गंभीर जखमी झाला.
ट्रेंडिंग बातमी - महत्वाची खाती भाजपकडेच राहाणार? मित्रपक्षाकडील खाती ही खेचून घेण्याची तयारी?
याअपघातात ज्यांचा मृत्यू झाला ते म्हारगुडे कुटुंबातील आहेत. हे मूळचे आटपाडी तालुक्यातील तळेगाव येथील रहिवाशी आहेत. ते गेल्या काही वर्षांपासून सांगलीत राहत होते. विशाल म्हारगुडे हे पत्नी दिपाली, मुलगा राजकुमार आणि सार्थक यांच्यासह दुचाकीवरून आटपाडी तळेवाडी येथे लग्न सोहळ्यासाठी चालले होते. कवलापूर कुमठे रोडवर पेट्रोल पंपासमोर अचानक समोरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपने दुचाकीला उडवले. यामध्ये विशाल हे हेल्मेट घातल्यामुळे जखमी झाले. तर पत्नीसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर जीप चालकाने तेथून पळ काढला. घटनेनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी जखमीसह सर्वांना शासकीय रुग्णालयात दाखल केले.
ट्रेंडिंग बातमी - 40 पानांची चिठ्ठी, तासाभराचा VIDEO; पत्नीच्या छळामुळे इंजिनिअरने संपवले जीवन
तर दुसरा अपघात हा पुणे सोलापूर महामार्गावर झाला. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला. पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन जवळील प्रयागधाम फाटा येथे हा अपघात झाला. पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. अपघातात दोन्ही ट्रकचं मोठं नुकसान झालं आहे. सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले महामार्गावरील लेन तोडून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये दोन्ही ट्रक चालकांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world