
अविनाश पवार
खेड तालुक्यात कुंडेश्वर दर्शनाला जाणाऱ्या महिलांच्या गाडीचा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यात 8 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 20 महिला या जखमी झाल्या आहेत. खेड तालुक्यातील देवदर्शनासाठी या महिला निघाल्या होत्या. त्यावेळी हा अपघात झाला. ही घटना खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कुंडेश्वर शिव मंदिराकडे जाताना घाट परिसरात घडली आहे.
( नक्की वाचा : Love Story : भयंकर! विवाहित महिलेनं प्रियकराला घरी बोलावलं, पती सोबत विवस्त्र केलं आणि स्क्रूड्रायव्हरनं... )
पापळवाडी येथील काही महिला दर्शनासाठी कुंडेश्वर येथे जात होत्या. या ठिकाणी जाताना घाटातून प्रवास करावा लागतो. या घाटातच त्यांची गाडी दरीत कोसळली. त्यामुळे या अपघातात 8 महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 20 पेक्षा जास्त महिला या जखमी असल्याचं बोललं जात आहे. अपघातानंतर जखमींना तातडीने पाईट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत.
( नक्की वाचा : घरी बसणाऱ्या नवऱ्याला जाब विचारणे जीवावर बेतले! सासरच्या छळाला कंटाळून पुण्यातील महिलेचा टोकाचा निर्णय )
अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस तात्काळ घटना स्थळावर दाखल झाले. त्यांनी तपास ही सुरू आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यांचा आकडा वाढण्याचीही भिती व्यक्त केली जात आहे. देव दर्शनाला जात असतानाच हा अपघात झाल्याने सर्व जण हळहळ व्यक्त करत आहेत.
मृत महिलांची नावं
१) शोभा ज्ञानेश्वर पापळ
२) सुमन काळूराम पापळ
३) शारदा रामदास चोरगे
४) मंदा कानिफ दरेकर
५) संजीवनी कैलास दरेकर
६) मिराबाई संभाजी चोरगे
७) बायडाबाई न्यानेश्वर दरेकर
८) शकुंतला तानाजी चोरघे
उपचार घेत असलेले नागरिक
# पाईट येथे स्थानिक पातळी उच्चार झालेले नागरिक
१) अलका शिवाजी चोरघे
२) रंजना दत्तात्रय कोळेकर
३) मालुबाई लक्ष्मण चोरघे
४) जया बाळू दरेकर
# पोखरकर हॉस्पिटल खेड
५) लता ताई करंडे
६) ऋतुराज कोतवाल
७) ऋषिकेश करंडे
८) निकिता पापळ
९) जयश्री पापळ
# गावडे हॉस्पिटल
१०) शकुंतला चोरगे
११) मनीषा दरेकर
# शिवतीर्थ हॉस्पिटल
१२) लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर
१३) कलाबाई मल्हारी लोंढे
१४) जनाबाई करंडे
१५) फसाबाई सावंत
१६) सुप्रिया लोंढे
१७) निशांत लोंढे
# केअर वेल हॉस्पिटल चाकण
१८) सिद्धी ज्ञानेश्वर पापळ
# बांबळे हॉस्पिटल
१९) कविता सारंग चोरगे
२०) सुलाबाई बाळासाहेब चोरगे
२१) सिद्धीकार रामदास चोरगे
२२)छबाबाई निवृत्ती पापळ
# साईनाथ हॉस्पिटल भोसरी
२३) सुलोचना कोळेकर
२४) मंगल शरद दरेकर
२५) पुनम वनाची पापळ
२६) जाईबाई वनाजी पापळ
# साळुंखे हॉस्पिटल खेड
२७) चित्रा शरद करंडे
२८) चंद्रभागा दत्तात्रय दरेकर
२९) मंदा चांगदेव पापळ
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world