जाहिरात
This Article is From Apr 28, 2024

ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ; खंडणी प्रकरणात माजी नगरसेवकाला 2 दिवसांची पोलीस कोठडी 

मविआचे उमेदवार राजन विचारे उद्या 29 एप्रिल रोजी अर्ज भरणार आहेच. मात्र त्यांच्यासोबत असणापे निष्ठावंत मढवी मात्र पोलीस कोठडीत आहेत. 

ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ; खंडणी प्रकरणात माजी नगरसेवकाला 2 दिवसांची पोलीस कोठडी 

नवी मुंबईतील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम के मढवी यांना ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून शनिवारी अटक करण्यात आली आहे. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे. मविआचे उमेदवार राजन विचारे उद्या 29 एप्रिल रोजी अर्ज भरणार आहेच. मात्र त्यांच्यासोबत असणापे निष्ठावंत मढवी मात्र पोलीस कोठडीत आहेत. 

केबल टाकण्यासाठी ठेकेदाराकडून अडीच लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी मढवी यांना अटक करण्यात आली आहे. आमदार संदीप नाईक यांच्याशी झालेल्या वादातून त्यांनी मढवी यांनी उद्धव ठाकरे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. नवी मुंबईतील ऐरोली परिसरात केबलची वायर टाकायची असल्यास मला अडीच लाख द्या, अशी मागणी मढवी यांनी ठेकेदारांना केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पहिला हप्ता दीड लाख घेतला आणि शनिवारी 1 लाख रुपये घेतना खंडणी पथकाने मढवी यांना रंगेहाथ पकडलं आहे.

ऐरोलीतील माजी नगरसेवक मढवी हे उध्दव ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत. ऐरोली सेक्टर 5 मधील कार्यालयातून त्यांना अटक करण्यात आली. यापूर्वी मारहाण प्रकरणात अनेक वेळा त्यांना अटक करण्यात आली आहे. तुरुंगातून निवडणूक लढवून पहिल्यांदा ते विजयी झाले होते. माजी आमदार संदीप नाईक यांच्याशी झालेल्या वादातून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश न करता त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. राजन विचारे यांच्या प्रचारातही ते आघाडीवर होते.

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम के मढवी यांना ठाण्यातील खंडणी विरोधी पथकाने अटक केली असून त्यांना आणि त्यांचा चालक अनिल मोरे यांना विशेष सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात आलं होतं.

नक्की वाचा - 'कुंकू लावायचा असेल तर एकाचाच लावा'; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम

पुढील तपासासाठी ठाणे न्यायालयात खंडणी विरोधी पथकाने त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. दरम्यान न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com