जाहिरात

विधानसभेच्या महाविजयात लोकसभेचा 'तो'निकाल झाकोळला, त्या विजयाचा अर्थ काय?

एकीकडे विधानसभेत पराभव होत असताना काँग्रेसने नांदेड लोकसभेची जागा मात्र राखली होती.

विधानसभेच्या महाविजयात लोकसभेचा 'तो'निकाल झाकोळला, त्या विजयाचा अर्थ काय?
नांदेड:

विधानसभा निवडणुकीत एकीकडे काँग्रेसची दाणदाण उडत होती. दिग्गजांचे गड कोसळत होते. जेष्ट नेत्यांना पराभवाचा धक्का बसत होता. आतापर्यंत राज्यात काँग्रेसने जो पराभव पाहीला नव्हता तो पराभव काँग्रेसच्या पदरात पडला होता. अशा स्थितीत काँग्रेसला दिलासा देणारा एक निकाल येत होता. एकीकडे विधानसभेत पराभव होत असताना काँग्रेसने नांदेड लोकसभेची जागा मात्र राखली होती. शेवटपर्यंत चुरशीच्या ठरलेल्या लढतीत काँग्रेसने बाजी मारली. विधानसभेला ज्या जनतेने काँग्रेसला नाकारले त्याच जनतेने लोकसभेला मात्र काँग्रेसने स्विकारल्याचं चित्र होतं. मात्र महायुतीचा विजयच इतका मोठा होता की या विजयाची साधी चर्चा ही झाली नाही.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्यात विधानसभा निवडणुकी बरोबरच नांदेड लोकसभेसाठी ही मतदान झाले होते. काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने इथं पोटनिवडणूक झाली होती. काँग्रेसनं वसंतराव चव्हाण यांचा मुलगा रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपने या निवडणुकीत पुर्ण ताकद लावत संतुकराव हंबर्डे यांना मैदानात उतरवले होते. हंबर्डे हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. दुपारी त्यांची आघाडी ही जवळपास 35 हजाराच्या जवळपास गेली होती. त्यामुळे काँग्रेसच्या हातून लोकसभेची ही जागा जाणार की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. 

ट्रेंडिंग बातमी - विधानसभा निवडणुकीत पराभव का झाला? शरद पवारांनी सांगितली 3 कारणं

ऐवढेच काय तर लोकसभेची भाजपची एक जागा वाढली आहे असं खुद्द पंतप्रधान मोदी यांनीही महाराष्ट्र विजयानंतर संबोधित करताना सांगितलं. पण त्याच्या काही मिनिटात गेम फिरला. मतमोजणीच्या शेवटच्या फेरीत रविंद्र चव्हाण यांनी कमबॅक केलं.  अखेर त्यांनी भाजप उमेदवारावर 1457 मतांनी निसटता विजय मिळवला. चव्हाण यांनी 5 लाख 86 हजार 788 मतं मिळाली. तर भाजपच्या संतुकराव हंबर्डे यांना 5 लाख 85 हजार 331 मतांवर समाधान करावं लागलं. तर वंचितच्या उमेदवारानं या मतदार संघात तब्बल 80 हजार मतं घेतली.  

ट्रेंडिंग बातमी - काँग्रेसला अति आत्मविश्वास नडला, चंद्रपूरात मोठा उलटफेर कसा झाला?

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत नांदेड लोकसभेत वसंतराव चव्हाणांनी अशोक चव्हाणांच्या वर्चस्वाला धक्का दिला होता. त्यांनी अनपेक्षित पणे या मतदार संघात विजय नोंदवला. त्यांनी त्यावेळच्या भाजप उमेदवार प्रतापराव चिखलीकरांता 59 हजारांनी पराभव केला होता. चार महिन्यानंतर झालेल्या निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांचा मुलगा मैदानात उतरला होता. त्याने ही जागा राखली पण मताधिक्य कमी झाले. पण काँग्रेसला दिलासा देणारी ही एकमेव बाब राहीली. राज्यात महायुतीची त्सुनामी असताना रविंद्र चव्हाण यांनी ही जागा राखली. पण या विजयाची चर्चा कुठेही झाली नाही. मात्र लोकसभेसाठी लोकांच्या मनात काय आहे याचीही चर्चा सध्या होत आहे.  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com