![Santhosh Deshmukh Murder प्रकरणाला 2 महिने पूर्ण, राजीनामा होणार का? अंजली दमानियांनी उपस्थित केले 3 प्रश्न Santhosh Deshmukh Murder प्रकरणाला 2 महिने पूर्ण, राजीनामा होणार का? अंजली दमानियांनी उपस्थित केले 3 प्रश्न](https://c.ndtvimg.com/2025-01/h3ub8qi8_anjali-damania_625x300_27_January_25.jpg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
Santhosh Deshmukh murder case : मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला (Massajog Santhosh Deshmukh murder case) आज 9 फेब्रुवारी रोजी दोन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र अद्यापही देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. अद्यापही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट (Anjali Damania tweet) करीत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे भाजप नेते सुरेश धस यांनीही हत्येप्रकरणी आकाचा राजीनामा घ्यावा. अजित पवारांनी याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.
धमक्या आणि हल्ल्यांमुळे परळीतील व्यापारी त्रस्त झाले होते. तेथील 500 व्यापाऱ्यांनी परळी शहर सोडून दिलं आहे. दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बेपत्ता आरोपी कृष्णा आंधळे राज्याच्या बाहेर गेला असावा अशी शक्यता सुरेश धस यांनी व्यक्त केली आहे. त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे होते. त्यामुळे तो सतत फरार राहिलेला आहे.
नक्की वाचा - धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मांना का सोडलं? मुलानं केला खळबळजनक खुलासा
आज स्वर्गीय संतोष देशमुख यांना जाऊन २ महिने पूर्ण झाले.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 8, 2025
आज तरी राजीनामा होणार का ?
आज स्व संतोष देशमुख यांना आदरांजली म्हणून एक detailed पत्र, ज्या मधे, धनंजय मुंडे यांच्या वरचे सगळे आरोप, मी पुरव्या सकट, मी मुख्यमंत्री, लोकायुक्त,अजित पवार, इलेक्शन कमिशन, CBI, CAG आणि ACB ला…
अंजली दमानियांचं ट्विट..
आज स्वर्गीय संतोष देशमुख यांना जाऊन दोन महिने पूर्ण झाले.
आज तरी राजीनामा होणार का?
आज स्वर्गवासी संतोष देशमुख यांना आदरांजली म्हणून एक सविस्तर पत्र ज्यामधे धनंजय मुंडे यांच्यावरील सगळे आरोप पुरव्या सकट मुख्यमंत्री, लोकायुक्त,अजित पवार, इलेक्शन कमिशन, CBI, CAG आणि ACB यांना पाठवत आहे. यांचा वाल्मिक कराडला पाठिंबा नसले तर ही क्रूर हत्या झाली नसती. आज तरी ते चौकशी लावतील आणि राजीनामा घेतील अशी अपेक्षा. अजून बरेच काही कळणे बाकी आहे.
* अजून त्या स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या फोनचा डेटादेखील रिट्रीव झालेला नाही. अजून का झाला नाही ?
* तो बडा नेता कोण आहे, अजून का कळले नाही?
* जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिपदावर आहे, तो पर्यंत दबाव राहणार. त्यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world