
इंदापूर तालुक्यातील वडापुरीत एका 23 वर्षीय गर्भवती महिलेचा घरीच गर्भपात केल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी इंदापूर पोलिसात मृत महिलेचा पति, सासू-सासरे अशा तिघांवर भारतीय न्याय दंड संहिता 2023 चे कलम 90, 91, 85, 3(5) नुसार मृत महिलेचा भाऊ विशाल शंकर पवार याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋतुजा राहुल धोत्रे (वय 23 वर्षे) असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून राहुल भिमराव धोत्रे, लक्ष्मी भिमराव धोत्रे आणि भिमराव उत्तम धोत्रे अशी आरोपींची नावे आहेत. गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा अस्तित्वात असून ही असं कृत्य केल्यानं या घटनेबाबत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ऋतुजाचा वडापुरी येथील राहुल धोत्रे याच्याशी सात वर्षापूर्वी विवाह झाला होता. तिला एक मुलगा एक मुलगी अशी अपत्य आहेत. ती चार महिन्याची गर्भवती असताना कुटुंबीयांनी तिची गर्भ तपासणी केली. तिच्या पोटात स्त्री जातीचा गर्भ आहे हे माहिती झाल्यानंतर पती, सासु व सासरे या सर्वांनी मिळून खाजगी डॉक्टर घरी बोलावुन ऋतुजाला गर्भपात होण्याच्या गोळया औषधे देऊन तिचा रविवारी गर्भपात केला. चार महिन्याचे स्त्री जातीचे अर्भक जमिनीमध्ये पुरून टाकले.
नक्की वाचा - 6 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक शोषणाचा प्रयत्न करीत होता नराधम, अचानक माकडं आली अन्..
मात्र गर्भपतानंतर ऋतुजाचा अति रक्तस्त्राव झाल्याने सोमवारी 23 सप्टेंबर रोजी मृत्यू झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अधिकचा तपास पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गटकुळ करीत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world