जाहिरात
This Article is From Aug 11, 2024

शेअर मार्केटमधून जास्त नफ्याचं आमिष, ट्रेडिंगच्या नावाखाली महिलेची 65 लाखांची फसवणूक

Navi Mumbai Fraud News : पोलिसांनी दिलेल्या माहितूनुसार, गुन्ह्याचा तपास सुरू असून यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तक्रारीत ओळखले गेलेले आणि नाव असलेले आरोपी राहुल शाह, प्रिया देसाई आणि वेबसाइटचे मालक आहेत.

शेअर मार्केटमधून जास्त नफ्याचं आमिष, ट्रेडिंगच्या नावाखाली महिलेची 65 लाखांची फसवणूक

राहुल कांबळे, नवी मुंबई

कळंबोली येथील 30 वर्षीय व्यक्तीची भामट्याने तब्बल 65 लाख रुपयांना फसवणूक केली आहे. शेअर ट्रेडिंगमध्ये 65 लाखांची फसवणूक केल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी शनिवारी येथे दिली.

नवी मुंबईच्या सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी या प्रतिनिधीला सांगितले की, पीडितेच्या तक्रारीच्या आधारे एका महिलेचा समावेश असलेल्या तीन आरोपींविरुद्ध आयपीसी आणि आयटी कायद्याच्या कलम 419, 420 आरडब्ल्यू 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितूनुसार, गुन्ह्याचा तपास सुरू असून यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तक्रारीत ओळखले गेलेले आणि नाव असलेले आरोपी राहुल शाह, प्रिया देसाई आणि वेबसाइटचे मालक आहेत. मे 2024 ते ऑगस्ट 2024 दरम्यान कथित आरोपीने पीडितेशी संपर्क साधला आणि त्याला नफ्याचे आश्वासन देऊन शेअर ट्रेडिंग करण्यास सांगितले. याच काळात पीडितेकडून वेगवेगळ्या खात्यांमध्ये 65,55,000 रुपये गुंतवण्यास सांगितले. 

महिला आपल्या परताव्याची वाट पाहत होती. आरोपींकडून महिलेने गुंतवलेल्या पैशांची मागणी केली त्यावेळी त्यांच्याकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळाली. त्यावेळी महिलेला कळालं की आपली फसवणूक झाली आहे. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच पीडितेने शुक्रवारी सायबर पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: