जाहिरात

प्रसिद्ध बीचवर बसलं होतं जोडपं, प्रियकराला बांधले आणि 10 जणांचा तरुणीवर अत्याचार

Odisha Crime News : आरोपींनी पुरुष मित्रालाही अडवून मारहाण केली. त्यांनी दोघांचे फोटो काढून पैसे न दिल्यास ते व्हायरल करण्याची धमकी दिली.

प्रसिद्ध बीचवर बसलं होतं जोडपं, प्रियकराला बांधले आणि  10 जणांचा तरुणीवर अत्याचार
Odisha : आरोपींनी या जोडप्यातील तरुणाला बांधून ठेवलं होतं.
मुंबई:

Odisha beach gang rape : समुद्र किनारा, बीच ही पर्यटकांना आकर्षित करणारी ठिकाणं असतात.  प्रसिद्ध बीचवर आवडत्या व्यक्तीची साथ असेल तर काही विचारायलाच नको. पण, त्या दुर्दैवी जोडप्यासाठी समुद्रकिनाऱ्यावरची रात्र ही भयंकर ठरली आहे. हे जोडपं प्रसिद्ध समुद्र किनाऱ्याजवळ बसलं होतं. त्याचवेळी एक टोळकं तिथं आलं त्यांनी त्यामधील तरुणाला बांधून ठेवले आणि नंतर तरुणीवर बलात्कार केला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील गोपाळपूर समुद्रकिनाऱ्याजवळ एका तरुणीवर हा बलात्कार झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. ही तरुणी तिच्या पुरुष मित्रासोबत समुद्रकिनाऱ्यावर गेली होती, त्यावेळी हा प्रकार घडला. 

काय आहे प्रकरण? (Odisha beach gang rape details)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी हिंजिलीकट परिसरातील आहेत. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास गोपाळपूर समुद्रकिनाऱ्यावर एका निर्जनस्थळी ती महिला आणि तिचा पुरुष मित्र बसले होते. त्यावेळी आरोपींनी कथितरित्या तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी त्यांच्या 'X' हँडलवर लिहिले आहे, 'गोपाळपूर समुद्रकिनाऱ्यावर एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने मला खूप दुःख झाले आहे. आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मी या घटनेसंदर्भात पोलीस अधिक्षकांशी बोललो आहे. या प्रकारच्या घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत यासाठी सखोल तपास आणि आवश्यक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.'

( नक्की वाचा : वाढदिवसासाठी खून ! 7 अल्पवयीन मुलांनी 42 वर्षांच्या व्यक्तीची हत्या करून केली पार्टी..! )
 

आरोपींनी पुरुष मित्रालाही अडवून मारहाण केली. त्यांनी दोघांचे फोटो काढून पैसे न दिल्यास ते व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपींनी कथितरित्या त्या महिलेला बाजूला नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर घटनास्थळावरून पळ काढला.

पोलिसांनी पुढे सांगितले की, आरोपींनी कथितरित्या महिलेच्या मित्राला काही अंतरावर ओढून नेले आणि त्याला बांधून ठेवले, तर इतरांनी एकामागून एक तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्कार पीडित महिला जवळच्या जिल्ह्यातील महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून, ती ब्रह्मपूर येथील एका खासगी मेसमध्ये राहत होती. ती तिच्या पुरुष मित्रासोबत समुद्रकिनाऱ्यावर गेली होती. तो तिचा वर्गमित्र देखील आहे.

ओडिशामधील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांमध्ये गंजम जिल्ह्यातील गोपाळपूर येथील समुद्रकिनाऱ्याचा समावेश होता. हा परिसर दूरदूरच्या पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. याच ठिकाणी हा प्रकार घडल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून हा गुन्हा कसा घडला हे शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com