जाहिरात

Gauri Garje Suicide Case: गौरी गर्जेंच्या मृत्यूच्या 5 तासांपूर्वी काय घडलं, FIRमधील 5 मुद्दे गूढ उलगडणार?

Gauri Garje Suicide Case: डॉ. गौरी गर्जे यांच्या मृत्यूच्या पाच तासांपूर्वी म्हणजे दुपारी 1 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या काळात नेमके काय घडलं, असा प्रश्न उपस्थित होतोय.

Gauri Garje Suicide Case: गौरी गर्जेंच्या मृत्यूच्या 5 तासांपूर्वी काय घडलं, FIRमधील 5 मुद्दे गूढ उलगडणार?
"Gauri Garje Suicide Case: गौरी गर्जेंसोबत त्या पाच तासांत नेमके काय घडलं?"
Anant Garje Instagram
  • गौरी गर्जे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात पंकजा मुंडे यांचा सहाय्यक अनंत गर्जे फरार
  • FIR नुसार अनंत गर्जेचे विवाहबाह्य संबंध असून त्याचा पुरावा पत्नीला मिळाला होता
  • अनंत गर्जेच्या बहिणीने भावाच्या दुसऱ्या लग्नाची धमकी गौरीला दिल्याचा आरोप
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Gauri Garje Suicide Case: महाराष्ट्राच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde PA) यांचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जे फरार झालाय. अनंत गर्जेची पत्नी गौरी पालवे-गर्जे यांनी कथित स्वरुपात घरगुती वादातून गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडालीय. दरम्यान मृत्यूच्या पाच तासांपूर्वी गौरी गर्जेंसोबत नेमके काय घडलं, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय. 22 नोव्हेंबर रोजी गौरी दुपारी 1 वाजेपर्यंत ड्युटीवर होत्या, त्यानंतर त्या घरी गेल्या. यानंतर संध्याकाळी 6.30 वाजता आत्महत्या प्रकरणाची माहिती समजली, अशी माहिती प्रसिद्धी माध्यमांना सांगत अंजली दमानियांनी त्या पाच तासांमध्ये नेमकं काय घडलं, हा प्रश्न उपस्थित केलाय. डॉ. गौरी गर्जे यांच्या वडिलांनी वरळी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केलीय, त्यामध्ये नेमके काय नमूद करण्यात आलंय? जाणून घेऊया... 

गौरी गर्जे यांच्या मृत्यूच्या पाच तासांपूर्वी काय घडलं? FIRमधील पाच महत्त्वाचे मुद्दे | Gauri Garje Death Case FIR 5 Points

FIRमधील पहिला मुद्दा : 30 सप्टेंबर 2025

गौरी यांच्या वडिलांना अनंत गर्जेच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाली. गौरीने वडिलांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर काही फोटो पाठवले, या फोटोमध्ये लातूरच्या ममता हॉस्पिटलची कागदपत्रं होती. ज्यामध्ये एका गर्भवती महिलेचं नाव होतं आणि पतीचं नाव अनंत भगवान गर्जे असं नमूद करण्यात आलं होतं. 

FIRमधील दुसरा मुद्दा

अनंत गर्जेची बहीण शीतल गर्जे-आंधळे आणि भाऊ अजय गर्जेला अनंतच्या प्रेमसंबंधाची माहिती आधीपासूनच होती. शीतल आंधळेनं गौरीला भाऊ अनंतचं दुसरं लग्न लावून देण्याची धमकी दिली होती. गौरी यांच्या आईने याबाबत शीतल आंधळेशी फोनवरुन संवाद साधला होता. तेव्हा शीतलने आम्ही आमचं बघून घेऊ असं म्हणत फोन ठेवला.

FIRमधील तिसरा मुद्दा : 3 ऑक्टोबर 2025

3 ऑक्टोबर रोजी अनंत गर्जेचा वाढदिवस होता. गौरीच्या आईवडिलांनी मुंबईला येण्याचा विचार केला, तसं त्यांनी गौरीला फोनवरुन कळवलं. पण गौरीने रडतरडत आईवडिलांना येऊ नका, असं सांगितलं. तरीही मुलीला पूर्वकल्पना न देता पालक तिच्या घरी पोहोचले. यावेळेस त्यांना गौरीच्या चेहऱ्यावर-गळ्यावर मारहाणीचे व्रण दिसले.

Gauri Garje Suicide Case: वरळी हादरली! आत्महत्या करणाऱ्या डॉ. गौरी गर्जे कोण होत्या, का उचललं टोकाचं पाऊल?

(नक्की वाचा: Gauri Garje Suicide Case: वरळी हादरली! आत्महत्या करणाऱ्या डॉ. गौरी गर्जे कोण होत्या, का उचललं टोकाचं पाऊल?)

FIRमधील चौथा मुद्दा

अनंतचा वाढदिवस साजरा करून आईवडील बीडला परतले. गौरी आणि तिच्या आईवडिलांची ही भेट शेवटची ठरली. यानंतर 21 नोव्हेंबर रोजी रात्री 10.15 वाजता अनंतने गौरीच्या वडिलांना फोन केला. वडील बाथरूममध्ये असल्यामुळे फोन उचलला नाही. काही वेळानंतर त्यांनी अनंतला फोन केला, पण त्याने फोनचं उत्तर दिलं नाही. मग वडिलांनी गौरीला फोन केला, तिने सर्व काही ठीक असल्याचं सांगितलं.

Gauri Garje Suicide Case: ते कागदपत्र, दुसऱ्या बाईचं नाव उघड...पंकजा मुंडेंच्या पीएनचं पत्नी गौरीला दिली होती सुसाइडची धमकी

(नक्की वाचा: Gauri Garje Suicide Case: ते कागदपत्र, दुसऱ्या बाईचं नाव उघड...पंकजा मुंडेंच्या पीएनचं पत्नी गौरीला दिली होती सुसाइडची धमकी)

FIRमधील पाचवा मुद्दा : 22 नोव्हेंबर 2025

शनिवारी संध्याकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास अनंतने गौरीच्या वडिलांना फोन केला. मामा गौरी सुसाइड करतेय तिला समजवा, असं अनंतने त्यांना सांगितलं. यावर गौरीला फोन द्या असे वडिलांनी म्हटलं पण अनंतने गौरीकडे फोन न देता तिला दवाखान्यात नेत असल्याचं सांगितलं. थोड्या वेळाने अनंतने गौरीच्या आईला फोन केला आणि माझ्यासमोर गौरीचं प्रेत असल्याचं सांगितलं.

दरम्यान गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या आईवडिलांसह नातेवाईकांनीही केलाय. त्यामुळे एफआयआरमधील या महत्त्वाच्या मुद्यांच्या आधारे गौरी यांच्या मृत्यूचं गूढ उलगडणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 

Pankaja Munde PA Wife | गौरी गर्जेंसोबत 'त्या' पाच तासात काय घडलं? दाखल केलेल्या FIR मध्ये काय?

Listen to the latest songs, only on JioSaavn.com