देवा राखुंडे, प्रतिनिधी
Baramati News : बारामती जिल्ह्यातील सुंदर नावाच्या बैलाच्या खरेदी-विक्रीवरून झालेल्या वादात रणजित निंबाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यात त्यांचा मृ्त्यू झाला होता. दरम्यान या प्रकरणात आरोपी गौतम काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. रणजित निंबाळकर यांच्यावर गुरुवारी गोळीबार झाला होता. गोळ्या झाडल्यानंतर गौतम काकडे फरार जाले होते. शुक्रवारी पहाटे रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर रविवारी गौतम काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. गौतम काकडे यांना अटक करा यासाठी रणजित निंबाळकर यांच्या पत्नीने आत्मदहनाचा इशारा दिला होता.
काय आहे प्रकरण?
रणजीत निंबाळकर यांनी 'सुंदर' नावाचा बैल आरोपी गौतम काकडे यांना 37 लाख रुपयांना विकला होता. त्यानंतर पाच लाख रुपये विसार म्हणून दिले होते. उर्वरित रक्कम 27 जून रोजी नेण्यासाठी बारामती तालुक्यातील निंबुत येथे त्यांच्या घरी बोलवले होते. त्यानुसार रात्री अकराच्या सुमारास रणजीत निंबाळकर फिर्यादी अंकिता निंबाळकर व त्यांची नऊ महिन्यांची मुलगी अंकुरण हे निंबुत येथे गौतम काकडे यांच्याकडे गेले होते. याच वेळी व्यवहाराचे रुपांतर वादात झालं आणि वाद निकोपाला गेला.
नक्की वाचा - 'सुंदर'मुळे बारामतीत घडला रक्तरंजित संघर्ष; रणजित निंबाळकरांसोबत नेमकं काय घडलं?
एकतर व्यवहार पूर्ण करा किंवा तुमचा अॅडवान्स परत देतो. मला माझा बैल परत द्या म्हणून रणजित निंबाळकर म्हणाले. याच वेळी गौरव काकडे यांनी रणजित निंबाळकर यांच्याकर गोळी झाडली. उपचारदरम्यान रणजित निंबाळकर यांचा मृत्यू झाला. वडगाव निंबाळकर पोलिसांनी या प्रकरणी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौरव काकडे याला अटक केली आहे. तर गौतम काकडे याचा शोध सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world