Aakash Chopra On Vaibhav Sooryavanshi : आयपीएल 2026 मध्ये धडाकेबाज प्रदर्शन केल्यानंतर 15 वर्षांचा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) ला भारतीय टी-20 आंतरराष्ट्रीय संघात सामील करण्याच्या मागणीनं जोर धरला आहे. परंतु,भारताचा माजी क्रिकेटर आकाश चोप्राचं म्हणणं आहे की, आता वैभवला टी-20 संघात जागा मिळणं कठीण आहे.आकाश चोप्राने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने म्हटलंय की,संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माचा समावेश असताना वैभवला भारताच्या टी-20 संघात जागा मिळणं कठीण आहे. सॅमसनने टी-20 वर्ल्डकप 2026 मध्ये अप्रतिम कामगिरी केली. तो 'प्लेयर ऑफ द टूर्नामेंट'ठरला.अशा परिस्थितीत सॅमसनच्या जागेवर वैभवला संघात घेणं उचित ठरणार नाही.
फायनलचा सामना 21 जून रोजी
आकाश चोप्राने म्हटलं की,अभिषेक शर्माही क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉर्मेटमध्ये सतत शानदार कामगिरी करत आहे. अभिषेक दिर्घकाळापासून टी-20 मध्ये जगात नंबर वन फलंदाज बनला आहे. हेच कारण आहे की,त्याच्या जागेवर आता वैभवला संघात संधी देणं योग्य ठरणार नाही. आकाश चोप्राने म्हटलं की,15 वर्षीय फलंदाज वैभव अप्रतिम फलंदाज आहे. पण भारतीय संघात येण्यासाठी आता त्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल.वैभवला श्रीलंकेत होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघात सामील केलं गेलं आहे.
नक्की वाच >> Vaibhav Sooryavanshi विराट कोहलीच्या कोचचा वैभव सूर्यवंशीला सल्ला, मोजक्या शब्दात थेट आणि स्पष्टच म्हणाले की..
आयपीएल 2026 मध्ये 72 षटकार ठोकले
या सीरिजची सुरुवात 9 जूनपासून होईल.तर फायनलचा सामना 21 जून रोजी खेळवण्यात येईल. या सीरिजमध्ये वैभवचं कामगिरी कशी ठरते,हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.आयपीएल 2026 मध्ये वैभवने धावांचा पाऊस पाडला. त्याने 16 सामन्यांमध्ये 237 च्या स्ट्राईक रेटने 776 धावा केल्या. तो ऑरेंज कॅप जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.त्याने एलिमिनेटर आणि दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली. वैभवने टूर्नामेंट दरम्यान ख्रिस गेलचा विक्रम मोडला आणि तो एका सीजनमध्ये सर्वाधीक षटकार ठोकणारा फलंदाज ठरला. वैभवने आयपीएल 2026 मध्ये 72 षटकार ठोकले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world