'त्या' तिन्ही पुजाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, मुख्यमंत्र्यांकडे महिला आमदाराची मागणी

या घटनेनंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला. या हत्या  प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅकवर करून या प्रकरणातील तिन्ही आरोपीना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी मुंबई:

राहुल कांबळे, नवी मुंबई

नवी मुंबईतील बेलापूर येथील अक्षता म्हात्रे हिच्यावर शिळफाटा येथे तीन पुजाऱ्यांनी आळापाळीने बलात्कार केला आणि तिचा खून करून झाडाझुडपात फेकून दिला. नेहमी वाहतूक कोंडी असणाऱ्या या परिसरात एका मुलीवर बलात्कार होता आणि तिची हत्या केली जाते. ही घटना धक्कादायक आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला. या हत्या  प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅकवर करून या प्रकरणातील तिन्ही आरोपीना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. 

नवी मुंबईतील कोपरखेरणे गावातील अक्षता आगस्कार यांचा विवाह बेलापूर गावातील कुणाल म्हात्रे यांच्याशी झाला होता. काही कारणास्तव अक्षता आणि त्यांच्या सासरच्या मंडळी बरोबर खटके उडत होते ही वस्तुस्थिती आहे. कुणाल म्हात्रे आणि माझे कोणाऱ्याही प्रकारचे नातेसंबंध नाही वा तो माझा कार्यकर्ता देखील नसल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी बोलताना स्पष्ट केले. अक्षता म्हात्रे यांच्यावर घडलेला अतिप्रसंग आणि त्याच्यातून घडलेली हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी दुर्देवी घटना असून एक महिला आणि आमदार म्हणून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत असल्याचे आमदार म्हात्रे यांनी बोलताना सांगितले.

या घटनेतील आगस्कार कुटुंबीयांवर आज दुःखाचा डोंगर पसरला आहे. अक्षता म्हात्रे हिच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी नवी मुंबई पोलीस  संबंधित पोलीस तपास अधिकारी यांच्या सतत संपर्कात असून यातील तिन्ही आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी. सदर तपास हा फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावा अशी मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी बोलताना केली.

नक्की वाचा - पुजाऱ्याच्या रुपात हैवान! मुंबईतील मंदिरात 30 वर्षीय महिलेवर आळीपाळीने अत्याचार, पुढे भयंकर घडलं!

नेमकं प्रकरण काय?
घरातील वादामुळे त्रस्त झालेली ही अक्षता शिळफाटा येथील गणेश घोळ मंदिरात शांततेसाठी गेली होती. येथे ती बराच वेळ शांत बसून होती. येथे उत्तर प्रदेशातील तीन पुजारी काही दिवसांपूर्वी मंदिर सांभाळण्यासाठी आले होते. त्यांनी अक्षताला दुपारी जेवायला दिलं. सायंकाळी तिच्या चहात अमली पदार्थ टाकून बेशुद्ध केलं. रात्री आळीपाळीने तिन्ही पुजाऱ्यांनी अक्षतावर बलात्कार केला. सकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हा आपल्यासोबत भयंकर घडल्याचं तिच्या लक्षात आलं. तिनं आरडाओरडा सुरू केला. यानंतर पुजाऱ्यांनी तिची हत्या करून झाडाझुडपात फेकून दिलं. 

Advertisement