- गुरुग्राम के DLF फेज-1 के पास से ऑटो ड्राइवर मनोज और उसके दो बच्चों का अपहरण कर यूपी के बरेली ले जाया गया था
- किडनैपर्स ने मनोज को बंधक बनाया और बच्चों को वापस गुरुग्राम लेकर जा रहे थे, तभी कार हादसे में पांच लोग मारे गए
- अपहरण का कारण मनोज की गोद ली बेटी का मृतक मनमोहन के साथ अफेयर था, जिसका वह विरोध करता था
Haryana News : देव तारी त्याला कोण मारी, अशी म्हण आहे. दोन मुलांचं अपहरण करुन पळवून घेऊन जात असताना अपहरणकर्त्यांच्या कारचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यात तिघांचाही मृत्यू झाला. या अपघातातून दोन्ही मुलं बचावली आहे.
हरियाणातील गुरुगाममधील डीएलएफ फेज-१ जवळ शनिवारी अपहरण झालेला रिक्षा चालक आणि त्याच्या दोन लहान मुलांच्या अपहरणाचं गूढ उकललं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा चालक आणि त्याच्या ३ आणि ६ वर्षांच्या मुलांना गुरुग्रामवरुन अपहरण करीत उत्तर प्रदेशातील बरेलीला घेऊन जाण्यात आलं होतं. अपहरणकर्त्यांनी रिक्षा चालकाला एके ठिकाणी ओलीस ठेवले आणि त्यांच्या मुलांना पुन्हा गुरुग्रामला घेऊन जात होते. यादरम्यान त्यांची कार रस्त्यात उभ्या असलेल्या टँकरला धडकली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आरोपींचाही समावेश होता. तर कारमधील दोन्ही मुलं किरकोळ जखमी झाले आहेत.
रिक्षा चालक आणि त्यांच्या मुलांचं अपहरण का केलं?
रिक्षा चालकाने मुलांचं अपहरण करुन त्यांना गुरुग्रामला परत का आणत होते, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिसांच्या तपासात एक वेगळच प्रकरण समोर आलं आहे. ज्यात अनैतिक संबंधांचा समावेश आहे. रिक्षा चालकाची बहीण दुसऱ्या पुरुषासोबत राहत होती आणि तिच्या दत्तक मुलीचं अपहरणकर्ता मनमोहनसोबत प्रेमसंबंध होते. ऑटो चालकाचा याला विरोध होता. याच रागामुळे आरोपींनी त्याला संपवण्याचा कट रचला. त्यांनी ऑटो चालक आणि त्याच्या मुलांचं अपहरण केलं. मुलांशी त्यांचे कोणतेही वैर नव्हते. त्यामुळे त्यांना परत सोडण्यासाठीच ते गुरुग्रामला जात होते. मात्र, वाटेत त्यांच्या गाडीचा अपघात झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world