
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या (Women Abuse) घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. हिंगोलीच्या (Hingoli Crime News) वसमत शहराजवळ असलेल्या पुर्णा साखर कारखान्या जवळ असलेल्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन युवतीने गळफास घेऊन स्वत:चाच जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
वसमत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखाना येथील एक अल्पवयीन मुलगी वसमतच्या कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीत शिक्षत होती. यावेळी त्याच भागात राहणारा गोरखनाथ बालाजी लुटे वय 22 हा तरुण त्या मुलीचा पाठलाग करत होता. मात्र ती मुलगी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. 'माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला नकार दिला तर मी तुला जीवे मारेन' अशी धमकीच त्याने मुलीला दिली होती. त्यामुळे ती घाबरून गेली होती.
नक्की वाचा - Pune Crime : पुण्यात हॉटस्पॉट दिला नाही म्हणून हत्या; भररस्त्यात चेहरा छिन्नविछिन्न होईपर्यंत ठेचला!
ती अल्पवयीन मुलगी गोरखनाथ याच्या त्रासाला कंटाळली होती. प्रेमाचा होकार मिळविण्यासाठी वारंवार तिला त्रास दिला जात होता. तिला जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याने ती घाबरली होती. त्यामुळे ती महाविद्यालयात जाण्यासाठी घाबरू लागली होती. त्यादिवशी मुलीचे वडील कारखान्यावर कामाला गेले होते. त्या दिवशी मुलीची आई देखील घरात नव्हती. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरखनाथ लुटे असं आरोपी युवकाचं नाव आहे. दरम्यान पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world