जाहिरात

Hingoli Election Results : हिंगोलीत महिलाराज! तिन्ही नगरपरिषदांवर महिला नगराध्यक्ष; इथं मविआची स्थिती काय?

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत आणि हिंगोली या तिन्ही नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला एकही जागा राखता आलेली नाही.

Hingoli Election Results : हिंगोलीत महिलाराज! तिन्ही नगरपरिषदांवर महिला नगराध्यक्ष; इथं मविआची स्थिती काय?

समाधान कांबळे, प्रतिनिधी

Hingoli News : नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहे. यामध्ये भाजप - १२०, शिंदेंची शिवसेना - ५७, अजित पवार गट - ३८, ठाकरे गट - १०, काँग्रेस - ३०, शरद पवार गट - १०, इतर - २३ नगराध्यक्ष जिंकून आले आहेत. यंदा भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत आणि हिंगोली या तिन्ही नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला एकही जागा राखता आलेली नाही. हिंगोली नगरपरिषदेमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा विजय झाला आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेल्या संतोष बांगर यांच्या भावजय रेखा बांगर यांना 23 हजार 79 मतं मिळाली असून त्यांचा यामध्ये दणदणीत विजय झाला आहे. तर महाविकास आघाडीकडून उभ्या असलेल्या शिवसेना उबाठाच्या उमेदवाराला केवळ 3 हजार 384 मतांवर समाधान मानालं लागलं आहे.

Nagarpalika Election Result : नगरपालिका निवडणुकीत भाजपची सरशी; महापालिकेत कसं असेल चित्र?

नक्की वाचा - Nagarpalika Election Result : नगरपालिका निवडणुकीत भाजपची सरशी; महापालिकेत कसं असेल चित्र?

वसमत नगरपरिषदेत काय आहे स्थिती?

त्याचबरोबर वसमत नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार सुनीता बाहेती 20 हजार 165 मतं मिळवून विजयी झाल्या आहेत. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या सीमा अब्दुल हाफिज यांना 16 हजार 714 मतं मिळाली असून त्यांचा या ठिकाणी पराभव झाला त्याचबरोबर महाविकास आघाडीचे वसमत नगरपरिषदेमध्ये केवळ सहा नगरसेवक निवडून आल्याने महाविकास आघाडीला वसमत नगरपरिषदेमध्ये चांगला फटका बसला आहे.

कळमनुरी नगरपरिषदेचा विचार करायला गेलं तर कळमनुरीमध्ये शिवसेना शिंदे यांचा उमेदवार विजय झाला आहे. शिवसेना शिंदे यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आश्लेषा चौधरी यांना 5 हजार 635 मध्ये मिळाली असून त्यांचा यामध्ये विजय झाला आहे. तर काँग्रेसचे उमेदवार यांना तीन हजार 288 मतं मिळाली असून त्यांचा यामध्ये पराभव झाला आहे. कळमनुरी नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाचा एकही नगरसेवक पदाचा एकही उमेदवार निवडून आला नाही, तर कळमनुरीमध्ये काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलंय.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com