नांदेड पोलीस दलात खळबळ! लिपिकाच्या अनैसर्गिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या,मृत्यूनंतरही धक्कादायक प्रकार उघड

Hingoli News: नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक अभिषेक सातपुते याच्या छळाला कंटाळून हिंगोलीतील 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Nanded News: धक्कादायक! पोलीस लिपिकाच्या जाचाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने घेतला गळफास"
Canva

- समाधान कांबळे, प्रतिनिधी

Hingoli News: नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील एका लिपिकाच्या छळाला कंटाळून हिंगोली जिल्ह्यातील एका 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी लिपिकाला अटक करून तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी तगादा

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील पेठवडगाव येथील हा तरुण काही काळापासून मानसिक तणावाखाली होता. नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेला लिपिक अभिषेक सातपुते हा त्याला वारंवार अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी तगादा लावत होता. या लिपिकाच्या सततच्या छळाला कंटाळून अखेर संबंधित तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आणि वडगाव शिवारात झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

Advertisement

(नक्की वाचा: Pune Breaking: पुणे हादरले! सुप्रसिद्ध लेखक डॉ. संपत जाधव यांना पिस्तुल दाखवून हल्ल्याचा प्रयत्न, मातंग समाजाच्या बैठकीनंतर राडा)

मृतदेहाची अवहेलना केल्याप्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा 

तरुणाच्या आत्महत्येनंतर संतप्त कुटुंबीयांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करत आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अभिषेक सातपुते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले असून आत्महत्येच्या घटनेनंतर मृतदेहाची अवहेलना केल्याप्रकरणी आणखी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.