जाहिरात

Dhule News : पत्नी माहेरी एकटी होती, पतीनं संधी साधून पत्नीसोबत केलं खतरनाक कृत्य, पोलिसही हादरले

पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे.घरगुती वादाने हिंसक वळण घेतलं आणि कुटुंबात रक्ताचा सडा पडला.

Dhule News : पत्नी माहेरी एकटी होती, पतीनं संधी साधून पत्नीसोबत केलं खतरनाक कृत्य, पोलिसही हादरले
Husband Attacked Wife Dhule Crime

नागिंद मोरे, प्रतिनिधी

Dhule Crime News Today : पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे.घरगुती वादाने हिंसक वळण घेतलं आणि कुटुंबात रक्ताचा सडा पडला.पतीनेच त्याच्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. गोरख महाले नावाच्या संशयित आरोपीने त्याची पत्नी यशोदा ही माहेरी एकटी असताना तिच्यावर धारधार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळनेर शहराच्या परिसरात घडलेली मागील काही दिवसांतील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरणं पसरलं आहे. या गंभीर घटनेची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) संजय भांबळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.तसेच पुराव्यांच्या संकलनासाठी 'फॉरेन्सिक टीम'देखील घटनास्थळी दाखल झाली असून तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. 

नक्की वाचा >> Pune News : वडिलांनी रात्री मोबाईल तपासताच नको ते घडलं, महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची दोन विशेष पथके तैनात

घटनेनंतर आरोपी गोरख महाले फरार झाला असून पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी दोन विशेष पथके तैनात केली आहेत. प्रशासकीय स्तरावर वेगाने तपास सुरू असला तरी,वारंवार घडणाऱ्या अशा भयंकर घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. या घटनांवर आळा कधी बसणार?असा सवाल येथील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

नक्की वाचा >> Kalyan News : हायप्रोफाईल सोसायटीतील रहिवासी संतापले, महापालिकेमुळे 'त्या' 112 कुटुंबावर वणवण भटकण्याची वेळ

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com